ठाणे : कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महिनाभरात कोरोना आणि साध्या आजाराबाबतचे तब्बल १५७ कॉल आले आहेत. यात मंगळवारी एका दिवसात आलेल्या ५७ कॉलचा समावेश आहे. दुसरीकडे महापालिकेने २१ कोरोनाग्रस्तांची चाचणी मुंबईत केली असून यातील १९ नागरिकांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा रिपोर्ट शिल्लक आहे. आतापर्यंत केवळ एकालाच त्याची लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले.अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथके तयार केली असून दिलेल्या वेळेत ही पथके प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत आहेत. या कक्षाला परदेशातून येणारे नागरिक, सोसायटीत नव्याने येणारे नागरिक, एखाद्याला साधा सर्दी-खोकला झाला असेल, तरी त्यासाठी येणारे कॉल असे काही फसवे तर काही महत्त्वाचे मिळून १५७ कॉल प्राप्त झाले आहेत. या सर्व १५७ कॉलची शहानिशा केली असून ज्या ठिकाणचा पत्ता या कॉलद्वारे दिला होता, त्या सर्व ठिकाणांना पालिकेच्या या पथकांनी भेटी दिल्या असून सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवार यांनी दिली.ओळखपत्राशिवाय प्रवेश नाहीमहापालिका मुख्यालयातदेखील प्रत्येकाला ओळखपत्र बघूनच सोडले जात आहे. तसेच येणाऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याचे कामही पालिकेच्या दोन गेटवर सुरू आहे.पालिका घेणार थर्मस कॅनेर्सची मदतपालिका मुख्यालयातील येणाºया नागरिकांचा ओढा लक्षात घेऊन पालिका पहिल्या टप्प्यात पाच थर्मस कॅनेर्सची मदत घेणार आहे. त्याद्वारे प्रवेशद्वारावर येणाºया नागरिकाची या कॅनेर्सद्वारे तपासणी केली जाणार असून नागरिकाच्या अंगात ताप वगैरे काही असेल, तर त्याची नोंद करून त्याला मज्जाव करून डॉक्टरांच्या टीममार्फत तपासणी केली जाणार आहे.
ठाण्यात २१ पैकी १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह, आपत्ती व्यवस्थापन कक्षात १५७ कॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:52 AM