ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९३० रुग्णांची रविवारी नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख ४६ हजार १०२ झाली असून, रविवारी २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या तीन हजार ९२१ झाली आहे.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे ३४७ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात एकूण ३० हजार १९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी चार जणांचा मृत्यू होऊन ठाण्यातील एकूण मृत्युसंख्या ८९३ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात रविवारी ५४९ रुग्ण नव्याने नोंदवण्यात आले. येथे आतापर्यंत एकूण ३५ हजार २३५ रुग्ण आढळले आहेत. रविवारी सात रुग्णाचा मृत्यू होऊन एकूण मृतांची संख्या ७२८ झाली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात ७३ नवे रुग्ण आढळल्याने येथील एकूण रुग्णसंख्या आठ हजार २८० झाली आहे.रविवारी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण २५१ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात रविवारी ३१ बाधित आढळले. मीरा-भार्इंदरमध्ये १७५ रुग्णांची तर, सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची एकूण संख्या १५ हजार २११ तर मृतांची संख्या ४७५ झाली आहे. अंबरनाथमध्ये ३९ रुग्णांची वाढ, तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ८६ रुग्णांची नोंद झाली आहे.रायगडमध्ये ७८३ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवार १३ सप्टेंबर रोजी ७८३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ३७ हजार १२६ वर पोचली आहे.नवी मुंबईत ३६८ नवीन रूग्णनवी मुंबई: मागील चोविस तासात शहरात ३६८ नवीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३०६६३ इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८६ टक्के इतके आहे.वसई-विरारमध्ये २३६ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात रविवारी दिवसभरात २३६ नवे रुग्ण आढळून आले असून १४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १९३० रुग्ण , २८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 2:55 AM