ठाणे : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव गावदेवी मैदान येथे १ मेपासून सुरू होत आहे. यंदाचे या महोत्सवाचे १३ वे वर्ष आहे अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. १ मे रोजी सायं. ४.३० वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कोकणातील बागायतदारांचे सेंद्रीय पद्धतीचे आंबे या महोत्सवात असणार आहे. आंबे व आंब्यांचे इतर पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे. यात कृषी विद्यापीठाचा वेगळा स्टॉल देखील असणार आहे. कोकणताली आंबा उत्पादक शेतकरी वेळोवेळी अडचणीत असतो. परंतू हा शेतकरी सर्व संकटावर मात करुन आंब्याची शेती करतो, या वर्षी ४० टक्के आंब्याचे उत्पादन झाले आहे अशी माहिती आ. केळकर यांनी दिली. या महोत्सवात २ व ३ मे रोजी मृणाल कुलकर्णी आणि निमिर्ती सावंत भेट देणार आहेत. कोकणातील १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड होते. २०१५ साली ३ लाख २० हजार मेट्रीक टन, २०१६ साली २ लाख ५६ हजार मेट्रीक टन तर २०१७ साली १ लाख २८ हजार मेट्रीक टन उत्पन्न झाले अशी खंत व्यक्त करत आंबा उत्पादन घटतंय याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. गेल्यावर्षी या महोत्सवात एक कोटीच्यावर उलाढाल झाली होती. २०१६ ला हाच आकडा दीड कोटी होता असे आ. केळकर यांनी सांगितले.
१ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सव, गावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:12 PM
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात आंबा आणि आंब्याच्या पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे १ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सवगावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार