ठाणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी मागासवगीर्य शिक्षकांना अग्रिम रक्कम देण्याचे निश्चित आहे. मात्र भिवंडी तालुक्यातील या शिक्षकांना अग्रिम रकमेपासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी ठाणे जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांच्याकडे केली आहे. या अग्रिम रकमेस देण्यासाठी टाळाटाळ करणार्या दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्याची मागणी या पदाधिकार्यांनी सीईओ यांच्याकडे लावून धरली आहे.
शासनाच्या वित्त विभागाने शिक्षक व कर्मचार्यांना आपल्या पसंतीच्या विविध दहा प्रकारच्या सणांसह व उत्सवासाठी बारा हजार ५०० रुपये सण अग्रीम घेण्याची परवानगी दिली आहे.त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सण अग्रिम देण्याची तरतूद आहे . मात्र भिवंडी तालुक्यातील २० मागासवर्गीय शिक्षकांनी दया अग्रिम रकमेची मागणी दीड महिना अगोदर भिवंडी पंचायत समिती कार्यालयाकडे केलेली असतानाहीे या शिक्षकांना या रकमेचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या या शिक्षकांनी या कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकार्यास धारेवर धरले आहे. याशिवाय सीईओ यांच्याकडे
भिवंडी तालुका प्रभारी गटशिक्षण अधिकारी निलम पाटील व कार्यालयीन कर्मचार्यांनी या २० शिक्षकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या आराेपासह सण अग्रिम मिळू नये म्हणून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे उशिरा पाठवल्याचा आराेप या संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सबंधित सर्व शिक्षकां साजरा करता आलेला नसल्याचे सीईओ यांच्या लक्षात आणून दिले आहे. यावर सीईओ आता काय कारवाई करणार याकडे या शिक्षकांचे लक्ष लागून आहे. संबंधीतांवर याेग्य कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अध्यक्ष विजय जाधव, यांच्यासह संतोष गाढे,अशोक गायकवाड, दिनेश शिंदे, अनिल गायकवाड, मनीषा खंडारे,वैशाली तांडेल,शारदा वाहने आदी पदाधिकार्यांचा समावेश हाेता.