कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राःमागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुंब्रा बायपास रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोगरा वरील गाजी मदिना मशिंदी जवळील परीसरातील डोंगरावरील माती ठिसूळ झाल्यने जमिन खचल्याची घटना उघडकीस आली.ही माहिती मिळताच ठामपाच्या संबधित विभागाच्या तसेच वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळाची पहाणी केली.
जमिन खचली असल्याचे त्यांच्या निर्दशनास येताच परीसरातील १५ ते २० घरे (झोपड्या) सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सील करण्यात आली.आणी त्यांमध्ये रहाणा-या कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले.सील करण्यात आलेल्या घरांमध्ये रहात असलेल्या कुटुंबांची रहाण्याची तात्पुर्ती व्यवस्था मुंब्रादेवी रोड परीसरातील ठामपाच्या शाळेत करण्यात आली असल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त बाळू पिचड यांनी लोकमतला दिली.दरम्यान डोंगरा वरील दरड कोसळली असल्याची अफवा पसरल्यामूळे काही काळ शहरात खळबळ उडाली होती.