घोडबंदर : राज्यभर मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या लाखोंच्या मोर्चांचे वादळ लवकरच ठाण्यात पोहोचणार आहे. ठाणे, पालघर आणि नवी मुंबई येथून अंदाजे २० लाखांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून गेली महिनाभर त्याची तयारी सुरू असल्याची माहिती मराठा क्र ांती मोर्चाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीने पत्रकार परिषदेत दिली. या मोर्चाच्या नियोजनासाठी २ि५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता दोन हजार सदस्यांची गडकरी रंगायतनमध्ये बैठक होणार आहे.गडकरी रंगायतन नाट्यगृहात आयोजित केलेल्या बैठकीत मोर्चाचे नियोजन करून तारीख व रूपरेषा ठरवली जाणार आहे. पुढील महिन्यात हा मोर्चा काढला जाऊ शकतो. कोपर्डी येथील बलात्कार घटनेतील आरोपींना फाशीची सजा देण्यात यावी, मराठ्यांना आरक्षण मिळावे, अॅट्रासिटी कायद्यात बदल करावा, अशा मागण्यांसाठी राज्यात आतापर्यंत १९ मोर्चे निघाले आहेत. लाखालाखांनी निघणाऱ्या मोर्चाचे कोणीही नेतृत्व करत नसल्याने त्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. ठाण्यातदेखील असाच मोर्चा काढला जावा, यासाठी अनेक मराठा संघटनांनी एकत्र येऊन तयारी केली आहे. या मोर्चात कुणबी व आगरी समाजासह अनेकांनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली असल्याचे या वेळी आयोजकांनी सांगितले.
ठाण्यात २० लाखांचा मराठा मोर्चा धडकणार
By admin | Published: September 23, 2016 3:19 AM