शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लोकसंख्येच्या वेगाने ठाण्यात वाहनेही ‘सुसाट’, लोकसंख्या २२ लाख, तर वाहने २० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 3:27 AM

एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे.

ठाणे : एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. आज शहराची लोकसंख्या ही २२ लाखांच्या घरात गेली आहे. तर, २० लाख ४५ हजार १२३ वाहने रस्त्यावर धावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या ही सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यावरून ठाणे शहरात दरतासाला तब्बल १२ वाहने खरेदी केली जात असल्याचे उघड झाले आहे.महापालिकेच्या प्रदूषण विभागाने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. ठाण्यातील मुख्य रस्ते हे मोठे आहेत. परंतु, त्यांच्यावर मेट्रो आणि इतर कामे सुरू झाल्याने त्या ठिकाणी कोंडी होऊ लागली असून ती फोडण्यासाठी शहराच्या विविध भागांत उड्डाणपूल उभारले आहेत. घोडबंदरपट्ट्यात तर चारचार पदरी रस्ते असतानाही या मार्गावर आजही कोंडी होत आहे. अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत बोलायचेच झाले तर स्टेशन परिसर, जांभळीनाका, कोर्टनाका, गोखले रोड, नौपाडा, मल्हार, सिव्हील रुग्णालयासह इतर रस्त्यांवर तर वाहनचालकांची वाहन कसरत सुरू असते. प्रदूषण विभागाने दिलेल्या अहवालानुसार दरवर्षी वाहनांच्या संख्येत ८ ते १० टकक्यांची वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात शहराच्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या आल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल. २०१६-१७ या वर्षात वाहनांची संख्या १९ लाख २७ हजार १५५ एवढी होती. यंदा मात्र त्यात वाढ झाली आहे.तर, २०१८-१९ या वर्षात शहरातील वाहनांची संख्या ही २० लाख ४५ हजार १२३ एवढी असून त्यामध्ये दुचाकींची संख्या ही सर्वाधिक आहे. ज्यामध्ये दुचाकींची संख्या ही १०,७६,५६४ एवढी आहे. तर ४,१४,२८४ एवढी कारची संख्या असून ४५,४१४ जीपसंख्या आहे. याशिवाय, १,०६,४८७ रिक्षा या ठाणे शहरात धावत असून ३७,४६१ टुरुस्टी कॅब, १२५९ स्कूलबस, ४७२ टीएमटी बस, ७७,५०४ ट्रक, ८,९३४ ट्रेलर, ११,६४० टँकर आणि १७५१ अ‍ॅम्ब्युलन्स रस्त्यावर धावत आहेत. ठाणे शहराच्या लोकसंख्येच्या आसपास आता वाहनांची संख्या आहे. तर, वाहतूक विभागाच्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी ठाणे शहरात एका नागरिकामागे वाहनांची संख्या ही दोन होती. परंतु, ती संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणखी कठीण होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी