कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहे. आज दोन कोरोना रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक जण कल्याण पश्चिम व एक जण डोंबिवली पूव्रेतील आहे. यापूर्वी कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला होता. आत्ता कोरोनामुळे मृतांची संख्या 7 झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 385 झाली आहे.
नव्या 2क् रुग्णांपैकी 6 जण हे डोंबिवली पूव्रेतील आहेत. कल्याण पूव्रेतील 8 जण आहेत. डोंबिवली पश्चिमेतील 2 जण आहेत. कल्याण पश्चिमेतील 2 जण आणि मांडा टिटवाळा परिसरातील एक रुग्णाचा समावेश आहे. या 20 रुग्णांमध्ये चार महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे.आत्तार्पयत एकूण उपचार घेत असलेल्या 130 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 248 आहे.