मीनाक्षी कुलकर्णीठाणे, दि. 13 - रिक्षावाल्यांच्या मुजोरीमुळे हैराण झालेल्या प्रवाशांच्या व्यथी आपण नेहमी ऐकत असतो, अनकेवेळा खुद्द आपल्यालाही तसा अनुभव येतो. पण ठाण्यात राहणारे संतोष सहकारी यांना आलेला रिक्षावाल्याचा अनुभव मात्र माणुसकी आणि प्रामाणिकपणावर पुन्हा विश्वास वाढवणारा आहे. ठाण्याचे रहिवासी असलेले संतोष सहकारी हे अंधेरीहून ठाण्याला परत येत असताना रिक्षातच लॅपटॉपची बॅग व पैसे विसरले, मात्र रिक्षाचालक राजेंद्र सिद्धपुरा यांनी स्वत:हून सहकारी यांचा शोध घेऊन ती बॅग परत केली. आजच्या काळात पैशाच्या लोभापायी सख्ख्या नातेवाईकांचे बळी दिले जात असताना, राजेंद्र यांच्या प्रामाणिकपणामुळे समाजापुढे एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. हिंदस्थान लिव्हर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारे संतोष सहकारी गेल्या आठवड्यात इजिप्तहून परतले आणि डायरेक्ट ऑफीसलाच गेले. त्यांच्या मुलाची संध्याकाळी अंधेरीत डेंटिस्टकडे अपॉईंटमेंट होती, ती झाल्यावर ते, मुलगा व पत्नीसह रिक्षातून अंधेरीहून ठाण्याला यायला निघाले. मात्र भाडे मिळत नसल्याचे कारण सांगत रिक्षावाल्याने त्यांना वर्तकनगरपर्यंत सोडण्यास नकार दिल्याने ते तिघे कोपरी चेक नाका येथे उतरले आणि दुसरी रिक्षा शोधून घरी येण्यास निघाले. मात्र अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर संतोषची लॅपटॉपची बॅग त्यांच्याकडे नसल्याचे त्यांच्या पत्नीला लक्षात आले. लॅपटॉप, सुमारे २० हजार रुपयांची परदेशी करन्सी, पासपोर्ट यासह अनेक महत्वाची कागदपत्रे असलेली ती बॅग हरवल्याने संतोष घाबरले आणि पुन्हा कोपरी नाका येथे पोहोचले. तेथे आजूबाजूच्या रिक्षा चालकांकडे विचारपूस करूनही त्यांना त्या रिक्षावाल्याचा शोध लागला नाही. अखेर तेथील पोलीस चौकीत तक्रार नोंदवल्यावर त्यांना पुन्हा अंधेरीला जाऊन तेथे रिक्षावाल्याचा शोध घेण्याचा सल्ला मिळाल्याने ते टॅक्सी करून पुन्हा अंधेरीच्या दिशेने रवाना झाले. या सर्व घडामोडीत सुमारे तासाभराचा अवधी उलटल्यामुळे सहकारी यांनी बॅग मिळण्याची आशा सोडून दिली होती. मात्र अर्ध्या रस्त्यात पोहचत असतानाच त्यांच्या मोबाईलवर त्या रिक्षावाल्याच्या सुनेचा फोन आला, तुमची बॅग आमच्याकडे राहिल्याचे सांगत भांडूप येथे येऊन बॅग घेऊन जाण्यास तिने सहकार यांना सांगितले. त्यांनी तातडीने भांडूप येथील मंगतराम पेट्रोलपंप येथे धाव घेतली असता रिक्षाचालक राजेंद्र सिद्धपुरा आपल्या पुतण्यासह सहकार यांची वाट पहात उभे होते. अखेर तासाभराचा तणाव, धावपळीनंतर सहकारी यांना त्यांची बॅग परत मिळाली
किसीसे लेकर नहीं, किसीको देकर खुश रहो ....सहकार यांना ठाण्याला सोडल्यानंतर मला आणखी एक भाडे मिळाले. त्यानंतर मी घरी आलो. मात्र नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणो गाडी बंद करून उभा करण्यापूर्वी मी तिची साफसफाई करू लागलो असता, मला गाडीत एक बॅग आढळली. मी माङया मुलाला ती बॅग उघडण्यास सांगितले आणि बॅगेच्या मालकाशी संपर्क साधण्यासाठी काही कागदपत्रे मिळतात का हे शोधायला सांगितले. त्या बॅगमध्ये संतोष यांची काही कागदपत्रे तसेच व्हिजिटिंग कार्ड्स होती, त्यावरचा नंबर पाहून माझ्या धाकट्या सुनेने त्यांना फोन केला आणि बॅग घेऊन जाण्यास सांगितले.माङो वडील नेहमी म्हणायचे किसीसे कुछ लेकर नही, किसीको कुछ देकर खुश रहा कर.. त्यांची ही शिकवण लक्षात ठेऊन मी आयुष्यभर वाटचाल केली आणि त्यामुळेच बॅगेतील लॅपटॉप आणि पैशांचा मला मोह झाला नाही, उलट ते लवकरात लवकर सहकारी यांना कसे देता येतील, याचाच विचार माझ्या मनात होता, असे रिक्षाचालक राजेंद्र यांनी सांगितले.