उल्हासनगर - उल्हासनगरच्या कॅम्प नं-3 येथील पेहुमहल कंपाउंड येथील प्लास्टिक पिशव्यांच्या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ महापालिकेने धाड टाकून तब्बल 20 टन प्लास्टिकचा साठा जप्त केला. कारखान्यातील कामगार पळून गेले असून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरात सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असून पालिकेने बंदची कारवाई केलेले कारखाने सुरू झाल्याची माहिती मिळाली. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महापालिका यांना पेहरूमल कंपाऊंडमध्ये प्लास्टिक कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता करखाण्यावर धाड टाकली असता प्लास्टिक गोणीत तब्बल 20 टन प्लास्टिक पिशव्या सापडल्या. धाडीच्या वेळी कामगारांनी पळ काढला असून कारखाना मालकांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली असून असे अनेक प्लास्टिक पिशव्यांचा कारखाने सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. पालिकेची नियमित कारवाई सुरू नसल्याने प्लास्टिक पिशव्याचे कारखाने सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
शहरात प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्याची संख्या मोठी असून जीन्स कारखान्या पाठोपाठ प्लास्टिक पिशव्याचा बंदीमुळे प्लास्टिक कारखान्याला ग्रहण लागले. बंदीमुळे यातील अनेक कारखाने गुजरात व भिवंडी-कल्याण ग्रामीण परिसरात स्थलांतरित झाले. मात्र काही कारखाने लपूनछपून अद्यापही सूर असल्याचे आजच्या कारवाईवरून उघड झाले. दरम्यान पालिका आरोग्य विभागाने प्लास्टिक दुकानदार, कारखानदार यांच्यावर कारवाई करून लाखोंची दंडात्मक कारवाई केली. मात्र त्यामध्ये सातत्य नसल्याने प्लास्टिक पिशव्याचा सर्रासपणे वापर सुरू आहे. धाडीत सापडलेल्या 20 टन प्लास्टिक पिशव्याचा साठा नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली. तसेच प्लास्टिक पिशव्या व करख्यावर कारवाई सुरूच ठेवणार असल्याची माहिती शिंपी यांनी दिली.
शेकडो जणांचा रोजगार बुडीत
शहरातील शेकडो जीन्स कारखाने बंद झाल्याने 50 हजार कामगार बेकार झाले. त्यापाठोपाठ प्लास्टिक पिशव्याचा बंदीमुळे शहरातील प्लास्टिक कारखाने बंद होऊन शेकडो कामगार बेकार झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
corona virus : भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प
Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा
विद्या चव्हाण यांच्या सुनेचा खळबळजनक दावा, 'ब्लॅकमेल' करत असल्याचाही आरोप
Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप