शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

ठाण्यात 2,005 नळजोडण्या खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:53 PM

थकबाकीदारांवर संक्रांत : ठाणे मनपाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेने पाणीबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यानुसार मागील १५ दिवसांत पाणीपुरवठा विभागाने २८८ नळजोडण्यांसह आतापर्यंत तब्बल २,००५ नळजोडण्या खंडित केल्या आहेत. याशिवाय ८४ पंप रूम सील करून ३५५ पंप जप्त केले आहेत.

ठाणे महापालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पाणीदेयके तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत नळसंयोजन खंडित करून पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रूम सील करणे, पंप जप्त करणे अशी कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मागील १५ दिवसांत २८८ नळजोडण्या खंडित करून पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत एकूण २,००५ नळजोडण्या खंडित केल्या असून ८४ पंप रूम सील तर ३५५ पंप जप्त केले आहेत. तरी नागरिकांनी पाणीबिलांचा एकरकमी भरणा करून ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीवरील १०० टक्के प्रशासकीय आकारात देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. तसेच ज्यांचे नळ संयोजन खंडित केलेले आहेत त्यांनी परस्पर पुन्हा नळजोडणी केली तर अशांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही दिला आहे.

थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत देयके अदा करून ठामपास सहकार्य करावे. अन्यथा नळसंयोजन खंडित केले जाणार आहे. शिवाय ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीवरील १०० टक्के प्रशासकीय आकारात सवलत दिलेली आहे. त्यामुळे त्याचाही लाभ थकबाकीदारांना घेता येईल.                - विनोद पवार,      कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

पाणीबिलांची यंदा ९० काेटी वसुलीपाणीपुरवठा विभागाने आजच्या तारखेपर्यंत ९० कोटींची पाणीबिलांची वसुली केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८६ कोटी रुपयांची वसुली केली होती. परंतु, यंदा कोरोनाकाळ असतानाही पाणीपुरवठा विभागाने चार कोटी रुपयांची जास्तीची वसुली केली आहे.

टॅग्स :thaneठाणे