२) शोध सुरू असलेले- ५४२६
३) पत्तेच सापडत नसेलेले आईवडील- २०१९
४) आतापर्यंत सापडलेली बालके- १२
५) मुलांची संख्या -६
६) मुलींची संख्या- ६
----------
* या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?
- या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह कायदेशीर सेवा पुरवणे, त्यांना मदत करून त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करण्यात येणार आहे.
......
* आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत -
सामाजिक सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह या बालकांना एक हजार १०० रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येईल. या आर्थिक पाठबळासह शैक्षणिक, सामाजिक सोयी-सुविधा. विविध योजनांचा लाभ करून दिला जाणार आहे.
......
* प्रतिक्रिया
- या अनाथ बालकांच्या पुनर्वसनासह त्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच जिल्हा कृती दल गठित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काम सुरू केले आहे. दहा मुलांचा शोध घेऊन त्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. उर्वरित बालकांचा शोध घेण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यासाठी साडेसात हजारपेक्षा जास्त मयतांच्या पाल्यांना शोधून काढावे लागणार आहे.
- रामकृष्ण रेड्डी,
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक