शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

मीरा भाईंदरच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात २०९ फेरबदल

By धीरज परब | Published: October 25, 2023 8:08 PM

फेरबदलासह आराखडा राज्य शासनाचा कोर्टात अंतिम मंजुरीसाठी

मीरारोड -  गेल्या अनेक वर्षां पासून प्रतीक्षेत असलेला मीरा भाईंदर महापालिकेचा सुधारित प्रारूप विकास आराखडा २०९ बदलांसह प्रसिद्ध करून तो अंतिम मंजुरी साठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागा कडे पाठवण्यात आला आहे . शासनाच्या मंजुरी नंतर आराखडा अंतिम होऊन अमलात येणार आहे . 

मीरा भाईंदर शहराचा विकास आराखडा १९९७ साली मीअंतिम करण्यात येऊन त्याची २० वर्षांची मुदत २०१६ सालीच संपुष्टात आली होती .  त्या नंतर विविध कारणांनी तसेच घोटाळा , आरोपांच्या फैरीत वादग्रस्त ठरला . २२ ऑक्टोबर २०२२ रोजी ठाणे सहायक संचालक नगररचना किशोर पाटील यांनी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता .  त्यावर सुमारे ५ हजार २०० इतक्या हरकती व सूचना आल्या असल्या तरी त्यात दुबार अर्जाची संख्या मोठी होती . त्यावर महापालिकेत सुनावणी घेण्यात आली होती . हरकती सूचनांचा विचार करून एमआरटीपी अधिनियम अंतर्गत  नियोजन समितीने अहवाल १८ ऑक्टोबर २०२३ रोजी नियुक्त अधिकारी यांच्या कडे सादर केला होता . 

नियोजन समितीने सादर केलेला अहवाल मान्य करण्यासाठी व शासन कडे मंजुरीसाठी पाठवण्याचा ठराव १९ ऑक्टोबर २०२३ रोजी  केला गेला . तर कलम २८ ( ४ ) नुसार केलेले फेरबदल हे नागरिकांच्या अवलोकनार्थ बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले आहेत . महापालिका मुख्यालयात व नगररचना ठाणे कार्यालयात बदल केलेले प्रारूप आराखड्याचे नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत . या शिवाय सदर नकाशे व आराखड्यात केलेले २०९ फेरबदल हे पालिकेच्या संकेत स्थळावर नागरिकांना पाहता येणार आहेत . ३० दिवसां साठी हे नकाशे व फेरबदलाची माहिती सदर दोन्ही कार्यालयात नागरिकांना पाहता येणार आहे . 

फेरबदलासह प्रसिद्ध केलेल्या ह्या प्रारूप आराखड्या वरून नवीन वादंग व आरोपांच्या फैरी झाडण्याची शक्यता आहे . कारण प्रारूप आराखडा हा शहर व नागरिकांच्या हिताचा नसून बिल्डर व राजकारणी बिल्डर यांच्या फायद्याचा असल्याचे आरोप होऊ लागले आहेत . 

सदर प्रारूप सुधारित विकास आराखडा हा शासना कडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून शासनास तो अंतिम मंजुरी करीता १ वर्षांची मुदत राहणार आहे . तर ज्या नागरिकांनी हरकती - सूचना दिल्या होत्या त्यावर सुनावणी होऊन नेमका काय निर्णय झाला ? याची माहिती मात्र नागरिकांना सध्या मिळणार नाही . शासनाने अंतिम मान्यता दिल्यावर ती माहिती नागरिकांना मिळू शकेल असे किशोर पाटील यांनी सांगितले . 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर