ठाणे : क्षयरोग व कुष्ठरोग या एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे. याच समस्येचे समूळ उच्चाटन करणेसाठी जिल्हा आरोग्य विभागाने संयुक्त सक्रिय क्षय व कुष्ठरुग्ण शोध मोहीम १ डिसेंबर ते १५ डिसेंबर यात कालावधीत हाती घेतली आहे.
ठाणे जिल्हयात एकूण २१४५ सर्वेक्षण टीमद्वारे घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोग जनजागृती करून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करून रोगांच्या लक्षणांची माहिती देण्यात येणार आहे. मनपा व ग्रामीण भागातील एकूण १९ लाख ७८हजार ५४४ इतक्या लोकसंख्याचे सर्वेक्षण या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे. तसेच रोगांचे लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्सरे, थुंकीतपासणी, सिबिनॅट तपास जवळच्या सरकारी दवाखान्यात करून रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार चालू करण्यात येणार आहेत. या मोहिमेत आढळणाऱ्या संशयीत क्षयरुग्णांच्या तपासण्या जसे की, थुंकीतपासणी, क्ष-किरण तसेच अत्याधुनिक सीबीनॅट (जीनएक्सपर्ट) मशिन द्वारे मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्या मधील थुंकी व क्ष-किरण, दूषीत रुग्णांना त्वरीत मोफत व पूर्ण औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे.क्षयरोग व कुष्ठरोग या एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे.
अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करा या शोध मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांचे गट करून घरोघरी जावून भेटी देणार असून क्षयरोग व कुष्ठरोग संबंधित पुर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन देतील. तरी या मोहिमेमध्ये जनतेने सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी, ठाणे डॉ.गिता काकडे यांनी केले आहे.