शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
2
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
3
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
4
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
5
अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."
6
दिवाळीपूर्वी 'या' बँकेचा ग्राहकांना झटका, सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदरात कपात, नवे दर काय?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
8
"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"
9
बियर्ड हटाओ, प्यार बचाओ! कॉलेजमधील मुलींचं आंदोलन; म्हणाल्या, गर्लफ्रेंड हवी की दाढी...
10
एअर डिफेन्स भेदत नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ कोसळलं लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन, इस्राइलमध्ये खळबळ   
11
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
12
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
13
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
14
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
15
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
16
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
17
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
18
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
19
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
20
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा

ठाण्यात २३ हजार लिटर पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

By जितेंद्र कालेकर | Published: October 14, 2024 8:08 PM

चालकाने प्रसंगावधान राखत अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने मिळविले आगीवर नियंत्रण.

जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोडमार्गे ठाण्याहून वसईकडे निघालेल्या तब्बल २३ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल भरलेल्या टँकरच्या टाकीवरील पेट्रोल भरण्याच्या होझ पाइपला सोमवारी दुपारी ३:४५ वाजता किरकोळ आग लागली. गायमुख जकात नाक्याजवळ घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टँकरचालक मनोज यादव यांनी अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वसईकडे जाणाऱ्या टँकरमध्ये प्रत्येकी पाच हजार लिटरचे पेट्रोल आणि डिझेलचे पाच कंपार्टमेंट होते. तब्बल २५ हजार लिटर क्षमतेच्या या टँकरमध्ये सुमारे २३ हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल होते. यातील एका कंपार्टमेंटच्या झाकणाच्या तोंडावरील होझ पाइपला अचानक आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच टँकरचालक मनोज यादव यांनी प्रसंगावधान राखून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वीच फायर एक्सटिंग्युशरच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली. आग न भडकल्याने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर हा टँकर पुढे वसईला रवाना झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच आग नियंत्रणात आणण्यात टँकर चालकाला यश आले.

टॅग्स :thaneठाणे