शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मैत्रेय कंपनीची २४ बँक खाती गोठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 5:00 AM

मैत्रेय कंपनीने आतापर्यंत सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची सुमारे १६ कोटींची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आले. यामुळे पोलिसांनी या कंपनीची २४ बँक खाती गोठवून कंपनीच्या विविध ठिकाणच्या ७७ मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत.

ठाणे - मैत्रेय कंपनीने आतापर्यंत सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची सुमारे १६ कोटींची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आले. यामुळे पोलिसांनी या कंपनीची २४ बँक खाती गोठवून कंपनीच्या विविध ठिकाणच्या ७७ मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. तसेच लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यांची लिलाव प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मैत्रेय कंपनीविरोधात ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई तसेच यवतमाळ, नंदुरबार आदी ठिकाणी एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. कळवा पोलीस ठाण्यात वर्षा सत्पाळकर हिच्यासह कंपनीचे संचालक अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर त्यांनी विजय तावरे व लक्ष्मीकांत नार्वेकर या दोघांना अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, अन्य चार जणांना फरार घोषित करून त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीसही काढली आहे. याचदरम्यान, गुन्ह्याचा तपास करताना सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची एकूण १५ कोटी ८० लाखांची फसवणूक झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले आहे. मालमत्तांच्या लिलावासाठी असलेली प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून ती लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीnewsबातम्या