शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

शालेय साहित्यखरेदीसाठी अडीच कोटींचा खर्च

By admin | Published: May 04, 2017 5:40 AM

दरवर्षी शालेय साहित्यखरेदी करताना शिक्षण विभागाकडून होणारा विलंब आणि यात चव्हाट्यावर येत असलेला भोंगळ

कल्याण : दरवर्षी शालेय साहित्यखरेदी करताना शिक्षण विभागाकडून होणारा विलंब आणि यात चव्हाट्यावर येत असलेला भोंगळ कारभार, याला चाप बसावा, यासाठी सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला एप्रिलच्या शिक्षण समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली होती. असे असताना शनिवारी बोलावलेल्या सभेत हा प्रस्ताव पुन्हा प्रशासनाने पटलावर ठेवला आहे. शालेय साहित्यखरेदीसाठी दोन कोटी ४६ लाखांचा खर्च येणार असून ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.डिसेंबर २०१६ मध्ये सरकारने हा अध्यादेश जारी केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तूस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबतचा हा अध्यादेश आहे. यामुळे लाभार्थ्यांना योजनांचा पूर्णपणे लाभ मिळेल आणि अनावश्यक गोष्टी टळू शकतील, असा सरकारचा उद्देश आहे. नवीन शिक्षण समिती स्थापन झाल्यानंतर १२ एप्रिलला समितीची पहिली सभा झाली. यात सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी हा अध्यादेश समितीसमोर मांडला होता. याला सर्वच सदस्यांनी एकमताने मान्यता दिली होती. दोन महिन्यांत सुटीच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करा, असे आदेश गुजर-घोलप यांनी प्रभारी शिक्षण अधिकारी जे.जे. तडवी यांना दिले. वेळेवर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले पाहिजे. त्यात दिरंगाई होता कामा नये, अशा सूचना सदस्य प्रभाकर जाधव आणि निलेश म्हात्रे, सुनीता खंडागळे यांनी केल्या होत्या. २७ गावांमधील शाळांमध्येही शालेय साहित्यांचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.दरम्यान, हा प्रस्ताव अशासकीय असल्याने तो प्रशासनाकडून दाखल करण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार, हा प्रस्ताव शनिवारच्या सभेत पुन्हा पटलावर संपूर्ण माहितीनिशी दाखल करण्यात आला आहे. यात अंदाजित खर्च दोन कोटी ४६ लाख ७ हजार ८२६ रुपये अपेक्षित आहे. यात गणवेश, दप्तर, वह्या, रेनकोट, पीटी ड्रेस आदींची खरेदी केली जाईल. केडीएमसीच्या ९ हजार ११८ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे शालेय साहित्य २७ गावांमधील विद्यार्थ्यांनादेखील दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)मागील वर्षी तीन कोटी ३२ लाखांचा खर्च मागील वर्षी शालेय साहित्यखरेदीसाठी तीन कोटी ३२ लाखांचा खर्च आला होता. यात गणवेश, दप्तर, रेनकोट, वह्या, कंपासपेटी, बूट,मोजे आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे २०१६-१७ या कालावधीत खरेदी केलेल्या साहित्याप्रकरणी संबंधित पुरवठादारास अद्याप त्याचे बिल अदा केलेले नाही. हा खर्च २०१७-१८ वर्षातील उपलब्ध तरतुदीनुसार अदा केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.