शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथच्या भाजी मंडईत 25 ते 30 नागरिकांना कुत्र्याचा चावा

By पंकज पाटील | Published: July 28, 2023 6:08 PM

अंबरनाथ स्टेशन परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून या भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्या काही नागरिकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला.

अंबरनाथ: अंबरनाथच्या भाजी मंडई परिसरामध्ये गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने 25 ते 30 नागरिकांना चावा घेतला आहे. एकाच वेळी एवढ्या नागरिकांना चावा घेतल्याने शासनाच्या छाया रुग्णालयात उपचार घेण्यासाठी या नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ आली. चावा घेतलेला प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे.

अंबरनाथ स्टेशन परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून या भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्या काही नागरिकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्या कुत्र्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न ज्या नागरिकांनी आणि दुकानदारांनी केला त्यांना देखील या कुत्र्याने चावा घेतला. तब्बल तासभर या कुत्र्याची दहशत भाजी मंडई परिसरात होती.

या तासाभरात 25 हून अधिक नागरिकांना या कुत्र्याने चावे घेतले. हा प्रकार घडल्यानंतर लागलीच स्थानिक रहिवासी शासनाच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी आले. या ठिकाणी एकाच वेळी उपचारासाठी नागरिक आल्याने प्रत्येकाला रांगेत उभे राहून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागले.

रात्री छाया रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी झाल्याने काहीसी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे या या पिसाळलेला कुत्र्याचा योग्य बंदोबस्त पालिका प्रशासनाने करावा एवढी माफक अपेक्षा नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथdogकुत्रा