उल्हासनगर: कॅम्प नं-३, २४ सेक्शन खत्री भवन परिसरात रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान एका टोळक्याने धुडगूस घालून २५ ते.३० गाड्याची तोडफोड केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकारने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधार मध्यवर्ती पोलिसांनी काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
उल्हासनगरात गावगुंडाचा हैदोस सुरू असून वाहने तोडफोडच्या घटना वारंवार घडीत आहेत. कॅम्प नं-३ येथील खत्री भवन परिसरात रस्त्याच्या कडेने नागरिक दुचाकी गाड्यासह रिक्षा, टेम्पो, कार व ट्रक पार्किंग करून ठेवतात. रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान एका टोळक्यांने हैदोस घालून तब्बल २५ ते ३० गाड्याची तोडफोड केली. सकाळी हा प्रकार उघड झाल्यावर, मध्यवर्ती पोलिसांना माहिती देण्यात आली. नागरिकांनी याप्रकाराचा निषेध केला असून कारवाईची मागणी केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे काही अल्पावयीन मुलांना ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने २५ ते ३० गाड्याची तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाला. चौकशी नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ।अधुकर कड यांनी दिले. तोडफोडीच्या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.