चिकणघर : १९८३ पासून मनपा निवडणुकांवर बहिष्कार टाकणाऱ्या २७ गावांत ३२ वर्षात प्रथमच मतदारांना मत द्यायला मिळणार असल्याने येथील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १९८३ च्या आॅक्टोबरला तत्कालीन कल्याण महापालिकेची स्थापना करताना जवळच्या एकूण ८१ खेड्यासोबतच २७ गावांचाही मनपात समावेश झाल्यापासून २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने गावांच्या समावेशाला विरोध करून रतन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलने केली. यानंतर १९ वर्षानंतर जुलै २००२ ला ही गावे शासनाने वगळून पंचायत राज आणले. मात्र, पुन्हा एकदा या गावांचा कारभार आॅगस्ट २००६ ला एमआयडीसीकडे सुपूर्द केल्याने संघर्ष समितीला आयतेच आंदोलनाचे कोळीत मिळाले. यावर कळस म्हणून १ जून २०१५ पासून सरकारने पुन्हा गावांना मनपात समावेश केला. मात्र लोकांचा विरोध आणि खरी हकीकत कळल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चुक सुधारण्याचे सांगून ७ सप्टेंबर २०१५ ला गावे वगळण्याची अधिसूचना काढली. मात्र निवडणुकीच्या काळात गावे वगळण्याची अधिसूचना आयोगाने धुडकावल्याने अखेर २७ गावांसह निवडणूक आहे.
२७ गावांच्या मतदानाची उत्सुकता
By admin | Published: October 28, 2015 11:17 PM