शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पतीला २७ हजार पगार, गृहिणीच्या बँक खात्यात २० कोटींची उलाढाल; ‘प्राप्तिकर’ची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 6:01 AM

पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट खाती उघडून फसवणूक झाल्याची तक्रार भाईंदर पाेलिसांसह प्राप्तिकर विभाग, रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.

मीरा रोड :

पतीला २७ हजार रुपये पगार, गृहकर्जाचे हप्ते भरणाऱ्या गृहिणीला प्राप्तिकर विभागाने दाेन बँक खात्यांतून २० काेटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल केल्याबाबत नाेटीस पाठविली आहे. या प्रकरणी तिने पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट खाती उघडून फसवणूक झाल्याची तक्रार भाईंदर पाेलिसांसह प्राप्तिकर विभाग, रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.

भाईंदर पश्चिमेस क्रॉस गार्डनजवळील फेरो कॉम्प्लेक्समध्ये आशा जैन या पती देविचंद व दाेन मुलांसह राहतात. त्यांना २९ मार्चला प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविली आहे. त्यात सिद्धी इंटरप्रायझेस भाईंदरच्या आयसीआयसीआय बँक शाखेतून सहा कोटी ३७ लाख ९१ हजार, तर मीरा रोडच्या डीसीबी बँक शाखेतून १४ कोटी तीन लाख ९६ हजारांचे व्यवहार २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात झाल्याबद्दल स्पष्टीकरण सादर करण्याची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, जैन यांच्या नावे त्या वर्षाचा एक लाख ५४ हजार इतका प्राप्तिकरही भरण्यात आला आहे. या प्रकाराने त्यांना मानसिक धक्का बसला आहे.

आर्थिक स्थिती बेताची असल्याने, दोन मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरात किराणा खरेदीसाठी काही संस्थांच्या मदतीवर आपण अवलंबून आहाेत. खाद्यपदार्थ बनवून विक्रीचा व्यवसाय असून, गाैतम भन्साळी नामक परिचित व्यक्तीने भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याची गळ घातली. पॅन कार्ड घेऊन सिद्धी इंटरप्रायझेस नावाने बँक खाते उघडले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ते खाते पत्र देऊन बंद केले हाेते. प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर, आयसीआयसीआय व डीसीबी बँकेत सिद्धी इंटरप्रायझेस नावाने बनावट खाती उघडून काेट्यवधींचे व्यवहार केल्याचे आढळले आहे.

धमकावले जात असल्याचा आराेप  गौतम याला जाब विचारला असता, आता तो धमकावत आहे.   या प्रकरणी गौतमसह अन्य काही लोकांची नावे देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाईंदर पोलिसांकडे लेखी तक्रारीद्वारे केल्याचे जैन यांनी सांगितले.   काळा पैसा हा पांढरा करण्यासह सरकारचा कर बुडविण्यासाठी संगनमताने हा घोटाळा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  बँकेत खाते उघडताना, मोबाइल क्रमांक, घरचा पत्ता गौतम याचाच असल्याचे आढळले. व्यवहारांची माहिती मिळू शकली नसल्याचे जैन यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम