भाईंदर : मीरा भार्इंदर पालिकेत २४ आणि १२ वर्ष सेवा बजावणाºया तब्बल २७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अखेर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाºयांचा यासाठी संघर्ष सुरू होता. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर कर्मचाºयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.१२ तसेच २४ वर्ष सेवा करणारे कर्मचारी व अधिकाºयांना कालबध्द पदोन्नती नुसार वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. अशा पात्र कर्मचाºयांना हा लाभ देणे बंधनकारक आहे. या मागणीसाठी कर्मचाºयांच्या संघटनेचे गोविंद परब व पदाधिकारी सातत्याने काही वर्षांपासून तत्कालिन तसेच विद्यमान महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करत होते. मार्च २०१६ मध्ये कर्मचाºयांनी संपही पुकारला होता. त्यानंतर महासभेने ठराव करून पात्र कर्मचाºयांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याचा ठरावही केला. परंतु तत्कालिन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये मंजूर झालेल्या सेवाशर्तींमधील शैक्षणिक पात्रतेवर बोट ठेऊन १२ व २४ वर्ष सेवा देणाºया अधिकारी, कर्मचाºयांना वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात खोडा घातला होता. वास्तविक २०१४ मध्ये मंजूर झालेल्या सेवाशर्तींमध्ये स्पष्ट नमूद होते की, ज्या दिवशी सेवाशर्ती मंजूर झाले त्या दिवसांपासून त्यातील अटी लागू होतील. परंतु म्हसाळ यांनी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांमध्ये नेहमीच आडकाठी चालवल्याने शेवटी मीरा- भाईंदर कामगार सेनेने त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार केली होती.दुसरीकडे भाजप प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेनेही वरिष्ठ वेतनश्रेणीची मागणी चालवली होती. म्हसाळ यांच्या बदलीनंतर मीरा- भाईंदर कामगार सेनेने पुन्हा पाठपुरावा केला. आयुक्तांना ही बाब निदर्शनास आणून दिली. अखेर सोमवारी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यास मान्यता दिली. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला.आयुक्त खतगावकरांसह महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती अॅड. रवी व्यास, सभागृह नेते रोहिदास पाटील, राजू भोईर आणि प्रवीण पाटील तसेच गोविंद परब यांनी कामगार सेनेच्या वतीने आभार मानले आहेत.या कर्मचाºयांनामिळणार लाभ२४ वर्ष सेवा पूर्ण झालेले १३३ कर्मचारी असून त्यात १०७ सफाई कामगार आहेत. शिवाय शिपाई, मुकादम तसेच वर्ग तीनचे स्वच्छता निरीक्षक, लिपीक व वाहनचालक यांचा समावेश आहे. १२ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या १३९ जणांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांपासून वर्ग एकपर्यंतचे अधिकारी आहेत. सफाई कामगार अधिक असून त्या शिवाय शिपाई, लिपीक, उद्यान अधीक्षक, उपअभियंता आदी विविध पदांवरील कर्मचारी, अधिकारी अहेत.
२७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी; आयुक्तांची मंजुरी, अनेक वर्षांच्या मागणीला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 11:49 PM