ठाणे : येथील जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या पाच तालुक्यांमध्ये असणाऱ्या २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड लसीकरण केंद्र सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली.
यामध्ये वांगणी, बदलापूर, सोनावळा, मांगरुळ, धसई, सरळगाव, किशोर, मोरोशी, शिरोशी, शिवळा, म्हसा, तुळई, दिवा-अंजूर, चिंबीपाडा, पडघा, कोन, किशोर दाभाड, वज्रेश्वरी, शेणवा, धसई शेद्रुण, कसारा, वासिंद, निळजे, खडवली आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल, अंबरनाथ छाया हॉस्पिटल, दुबे हॉस्पिटल, बदलापूर, ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, शहापूर व भिवंडी उपजिल्हा रुग्णालय, मुरबाड व टोकावडे ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. पुढील आठवड्यात अघई व आनगाव येथे लसीकरण केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.