- नारायण जाधवठाणे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरे हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने ठाण्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात ५७०१ वैयक्तिक शौचालये बांधण्यास २०१८-१९ मध्ये मंजुरी दिली असून त्यासाठी सात कोटी ६५ लाख ७२ हजार इतके अनुदान मंजूर होऊन वितरित केले आहे. यात केंद्र आणि राज्याच्या हिश्श्याचा समावेश आहे. राज्यात वितरित होणाऱ्या २०७ कोटी ८३ लाख रुपयांच्या तरतुदीतून हे अनुदान ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांना वितरित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे ३४ हजार ९६६ कुटुंबांचा यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, त्यातील २९२६५ कुटुंबांना या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत येत्या आॅक्टोबरअखेरपर्यंत संपूर्ण देश हगणदारीमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्यातील संपूर्ण नागरी भाग हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही शहरी भागातील काही कुटुंबे वैयक्तिक शौचालयांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले होते.यातील काही कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करत असल्याचे उघड झाले होते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून अशा कुटुंबांना अनुदान देण्यात येते. त्यासाठी यंदा ठाणे जिल्ह्यातील ३४९६६ कुटुंबांची सुधारित संख्या काढण्यात आली होती. त्यापैकी ५७०१ कुटुंबांची अनुदानासाठी निवड करण्यात आली आहे.>महापालिकानिहाय त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणेशहराचे नाव सुधारित कुटुंब संख्या निवड झालेली कुटुंब संख्या अनुदानाची रक्कमभिवंडी ५८५६ ६७८ ८१३६०००कल्याण-डोंबिवली ४६८० ६८० ८१६००००मीरा-भार्इंदर ४१४८ ६८० ८१६००००नवी मुंबई ५७७४ ८८७ १०६४४०००उल्हासनगर २६६५ ९९२ ११९०४०००ठाणे ११८४३ २४६४ २९५६८०००३४९६६ ५७०१ ७,६५,७२०००
ठाण्यातील २९ हजार २६५ कुटुंबे अनुदानापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 2:44 AM