उल्हासनगर : महापालिकेने शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्याखाली करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. महापालिकेने सर्वेक्षण केलेल्या इमारती पैकी २९४ इमारती धोकादायक घोषित करून, त्यांना नोटिसा देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. इमारती मधील हजारो नागरिक या नोटिसेने हवालदिल झाले. प्रभाग समिती क्रं-१ मध्ये सर्वाधिक ९७ इमारती धोकादायक असून प्रभाग समिती क्रं-२ मध्ये ७१, प्रभाग समिती क्रं-३ मध्ये ७३ तर प्रभाग समिती क्रं-४ मध्ये ५३ इमारती धोकादायक आहेत. एकून २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक तर ५० इमारती खाली करून त्याची दुरुस्ती सुचविली आहे. २१४ इमारतीला खाली न करता दुरुस्ती करण्यासाज सूचवून असून २२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्या खाली करून, त्यांची वीज व पाण्याची जोडणी खंडित केली. मात्र ज्या ५० इमारती खाली करून त्यांची दुरुस्ती सुचविली आहे. त्या इमारती मध्ये शेकडो कुटुंब असून त्या खाली कश्या करायच्या असा प्रश्न महापालिके समोर पडला आहे. दरम्यान १० वर्ष जुन्या १३०० इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास, बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था महापालिकेकडे उपलब्ध नाही. शासनाने मंजूर केलेल्या ३० कोटीच्या निधीतून ट्रान्झिट कॅम्प बांधण्याची घोषणा नुकतीच आयुक्त अजीज शेख यांनी केली आहे.