लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने नवीमुंबईतील एमआयडीसी, तुर्भे येथील मे,अमर युनिवर्सल प्रा.लि. येथे केलेल्या तपासणीत मसाले पदार्थ, कडधान्ये, सुका मेवा असा एकूण २ लाख ८७ हजार ८५१ किलोच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याची बाजारभाव किंमत ३ कोटी ०६ लाख ७४ हजार ९६० रुपये इतकी असून हा साठा कमी दर्जाचा व मुदतबाह्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री बाबा आश्रम व प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण राज्यात विविध अन्न पदार्थाचा साठा करीत असलेल्या कोल्ड स्टोअरेजची तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कायदा असून त्यांचे प्रमुख उद्दिष्ट जनतेला सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हाच आहे.
या पार्श्वभूमीवर ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याखालील नियम २०११ अंतर्गत केलेल्या तपासणीत जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या तरतुदीचे पालन होत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार वरील किंमतीचा साठा कमी दर्जाचा व मुदतबाह्य असल्याचे संशयावरून तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत Labelling and Display नियमन २०२० चे उल्लंघन होत असल्याने तसेच कायद्यातील तरतुदींचा भंग करीत असल्याने जनहित व जन आरोग्य विचारात घेऊन जप्त करण्यात आला आहे.ही कार्यवाही सह आयुक्त, (अन्न) सुरेश देशमुख, सहाय्यक आयुक्त (अन्न) ठाणे जी. व्ही. जगताप, यो. हि. ढाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बी.सी. वसावे, पी. एस. पवार, एस. एस. खटावकर, आय. एन. चिलवते या पथकाने केली.