शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

दिशा मारोला केंद्र सरकारकडून ३ लाखांची मदत

By admin | Published: March 09, 2016 5:49 AM

अपंगत्वावर मात करीत यूएस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत अटकेपार झेंडा रोवणाऱ्या दिशा मारोच्या कर्तृत्वाची दखल

वैभव गायकर, पनवेलअपंगत्वावर मात करीत यूएस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत अटकेपार झेंडा रोवणाऱ्या दिशा मारोच्या कर्तृत्वाची दखल खुद्द केंद्र सरकारने घेतली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने मोदी सरकारने दिशाच्या बँक खात्यात सुमारे ३ लाख रोख रक्कम जमा करून तिला खऱ्या अर्थाने महिला दिनाची अनोखी भेट दिली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या आॅलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्सच्या ४० मी. फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये पनवेलच्या दिशा मारू (२७) हिने ४० मीटर फ्री स्टाइल प्रकारात रौप्यपदक मिळवून साऱ्यांनाच अवाक केले. जन्मापासून अपंगत्व व गतिमंद असलेल्या दिशाने याआधी २५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत कांस्य पदक मिळविले आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या दिशाने २०१३ मध्ये कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्पेशल आॅलिंपिक स्पर्धेत फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदक, कर्नाटकातील मोंडा येथे फ्री स्टाइल व ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण आणि रिले प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. तसेच आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक आशिया पॅसिफिक स्पर्धेत रिले प्रकारात दोन कांस्यपदके मिळवली आहेत. दिशा गेली २३ वर्षांपासून स्वामी ब्रम्हानंद शाळेची विद्यार्थिनी आहे. शाळेचे संस्थापक शिरीष पुजारी व प्राचार्या सुकन्या वेंकटरामन यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, आॅलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्सच्या ४0 मी. फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये रौप्यपदक मिळवल्याबद्दल दिशाला केंद्र सरकारकडून मदत जाहीर झाली होती.