कल्याण : केडीएमसीने गोदरेज कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारलेल्या प्लास्टिक कचरा प्रक्रिया प्रकल्पात दोन महिन्यांत प्लास्टिकपासून ८० टन फर्नेस आॅइल तयार करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्पास पुरेसा प्लास्टिक कचरा मिळत नसल्याची बाबही यानिमित्ताने उघडकीस आली आहे.महापालिका हद्दीतून गोळा होणाºया ६५० टन कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारले जात नसल्याने महापालिका नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरली आहे. महापालिकेचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाने नगरविकास खात्याला कळवले आहे. मात्र, आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प २ आॅक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्याचे लक्ष्य आहे. बारावे व मांडा प्रकल्पाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.महापालिका हद्दीत प्लास्टिक कचºयाचे प्रमाण एकूण गोळा होणाºया कचºयापैकी सात टक्के आहे. जवळपास दररोज ४० टन प्लास्टिक कचरा गोळा होता. मात्र, त्यावर प्रक्रिया केली जात नव्हती. महापालिकेने ‘गोदरेज’च्या नऊ कोटींच्या सीएसआर फंडातून बारावे येथे पाच टन प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून फर्नेस आॅइल तयार करण्याचा प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पाची पाच टन क्षमता असतानाही केवळ दोन टन प्लास्टिक कचरा मिळतो. मागील दोन महिन्यांत या कचºयावर प्रक्रिया करून ८० टन फर्नेस आॅइल तयार केले आहे. या आॅइलचा वापर मोठ्या कंपन्यांतील रासायनिक भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून केला जातो. गोदरेज कंपनी ८० टन फर्नेस आॅइलचा वापर उत्पादनासाठी करणार आहे.महापालिका हद्दीतून गोळा होणाºया ४० टन प्लास्टिक कचºयापैकी ज्या कचºयाचा पुनर्वापर होऊ शकत नाही, असा १० ते १२ टन कचरा हा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर येतो. उर्वरित ३० टन प्लास्टिक कचरा हा कचरावेचक गोळा करून तो भंगारवाल्याकडे विकतात. महापालिकेच्या चार वेस्ट बँकांमधून गोळा होणारा प्लास्टिक कचरा हा गोदरेजने उभारलेल्या प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्राकडे पाठवला जातो. प्लास्टिक कचरा प्रक्रियेसोबत पुनर्वापर न होणाºया कचºयापासून विटा, तर अन्य कचºयापासून प्लास्टिकचे दाणे तयार केले जाणार आहे. त्याचा वापर प्लास्टिकच्या बाटल्या तयार करणाºया कारखान्यात केला जातो. विटा व प्लास्टिकचे दाणे तयार करण्याचे दोन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. प्लास्टिकचा कचरा डम्पिंगवर जाऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे.प्लास्टिक पिशव्यांविरोधात २ आॅक्टोबरपासून मोहीमप्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई महापालिकेकडून केली जाते. मात्र, ती प्रभावी होत नाही. त्याबाबत, अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेकडे बोट दाखवले आहे. ही कारवाई प्रभावी करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी तिचा पुनर्प्रारंभ गांधी जयंती, २ आॅक्टोबरपासून करण्याचा मानस महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी व्यक्त केला आहे.
प्लास्टिकपासून ८० टन फर्नेस ऑइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:02 AM