शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शौचालयांसाठी ३० कोटी

By admin | Published: October 11, 2015 12:21 AM

जिल्ह्यातील प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागापाठोपाठ आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे (नरेगा) देखील वैयक्तिक शौचालये

- सुरेश लोखंडे,  ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागापाठोपाठ आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे (नरेगा) देखील वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जिल्हाभरात सुमारे २५ हजार ४३ शौचालये नव्याने बांधण्याचे प्रस्तावित केले. यासाठी सुमारे तीस कोटी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. त्यावर, स्थानिक कुशल व अकुशल मजुरांना प्राधान्याने रोजगार दिला जाणार आहे.या आर्थिक वर्षात नरेगाने जिल्ह्यात सुमारे १० हजार ४१ वैयक्तिक शौचालयांची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी १२ कोटी चार लाख ९२ हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. या कामांवरदेखील स्थानिक गावपाड्यांच्या कुशल, अकुशल कामगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्ह्यातील ४२७ ग्रामपंचायतींव्दारे करण्यात येत असलेल्या सेल्फच्या कामांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्याचेदेखील नियोजन केले आहे. त्यानुसार, आतापर्यंत सर्व तालुक्यांमधील कामे पूर्ण झालेली असून केवळ भिवंडी तालुक्यात ११७ व कल्याणमध्ये १९ कामे अर्धवट असून ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत.गावातील एकही व्यक्ती रस्त्याच्या कडेला किंवा अन्य ठिकाणी उघड्यावरशौचास बसू नये, म्हणून प्रत्येक घराला वैयक्तिक शौचालय बांधणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नरेगाव्दारे घरमालकास १२ हजार रुपयांचे अनुदान मंजूरही केलेले आहे. यानुसार, वर्षभरात १० हजार शौचालयांची कामे पूर्ण केली जात आहेत. उर्वरित गावपाड्यांसाठी २५ हजार ४३ शौचालयांसाठीदेखील अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. भिवंडी तालुक्यात सर्वाधिक २००६८ शौचालये प्रस्तावित केलेली आहेत. याखालोखाल मुरबाडला २२५४, शहापूरला १६८८, अंबरनाथला ८८६ आणि कल्याणला १४७ शौचालये आगामी काळात बांधण्याचे नियोजन नरेगाने केले आहे.