शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोकिळा व्रताचा ३० पासून श्रीगणेशा

By admin | Published: July 30, 2015 12:32 AM

आम्रवृक्षावर मधुर स्वरात कुहूकुहू करणाऱ्या कोकिळा शब्दश्रवणाचा अंतर्भाव असल्याने निसर्ग महिमा व पक्षी-जाती-संवर्धन असा कोकिला व्रताचा मुख्य उद्देश आहे.

ठाणे : आम्रवृक्षावर मधुर स्वरात कुहूकुहू करणाऱ्या कोकिळा शब्दश्रवणाचा अंतर्भाव असल्याने निसर्ग महिमा व पक्षी-जाती-संवर्धन असा कोकिला व्रताचा मुख्य उद्देश आहे. शारीरिकदृष्ट्या सामान्य व कुरूप व्यक्तींमध्येही चांगले गुण असतात. त्यामुळे निसर्गरचनेत प्रत्येक घटकाला विशिष्ट स्थान आहे, ही या व्रताची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळेच आंब्याची लाकडे तोडणे व कोकिळादींना पिंजऱ्यात कोंडणे, या काळात बिलकूल स्थान नाही, हे ध्यानात घेऊन आजकालच्या सर्व सुशिक्षित स्त्रियांनी समाजप्रबोधन, निसर्ग व पक्षी संरक्षण, सामाजिक एकोपा व परस्पर स्नेहवृद्धीसाठी हे व्रत श्रद्धेने व सुजाणपणे करावे, अशी अपेक्षा आहे. तब्बल दीड तपानंतर येणारे तब्बल दीड तपानंतर येणारे कोकिळा व्रत इ.स. १७९० नंतर यंदा सिंहस्थ पर्वणीत आल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महिलावर्गात या व्रताची उत्सुकता वाढली आहे. महिनाभर चालणाऱ्या या व्रताचा श्रीगणेशा ३० जुलैपासून होत आहे.स्वाभाविकच धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या महिलावर्गात या अनोख्या कोकिळा व्रताची सिद्धता करीत असून साधारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे व्रत केवळ तीन किंवा चार वेळेस येते तसेच अगदी बालपणीचे व्रत आठवत नसल्यानेतरु ण स्त्रियांमध्ये याबद्दल श्रद्धा, कुतुहल प्रकर्षाने व्यक्त होत आहे.आख्यायिकामाहेरी दक्ष प्रजापतीकडे यज्ञ सोहळा असूनही आमंत्रण नसलेली पार्वती शिवशंकराच्या सूचनेनंतरही माहेरच्या ओढीने त्या सोहळ्यास गेली. तेथे आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. देवाच्या विनंतीवरूनही शंकरांनी शिरच्छेद केलेल्या दक्ष प्रजापतीस मेषाचे शिर बसवून पुनर्जीवित केले, अशी पौराणिक आख्यायिका आहे.आत्मत्याग दोषामुळे तू कोकिळा होऊन फिरशील, असा पार्वतीला शाप दिल्यामुळे पार्वतीस कोकिळा स्वरूप प्राप्त झाले. या रूपात गणपती, ब्रह्मा, विष्णू यांनी तिची पूजा, उपासना केली. या व्रतामुळे स्त्रियांचे कल्याण व सौभाग्यवृद्धी होईल, असा शंकरांनी वर दिला. गुरू वसिष्ठांच्या उपदेशानुसार शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमालेने प्रथम हे व्रत केले. श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार द्रौपदीने या व्रताचा अंगीकार व प्रसार केला, अशी श्रद्धा आहे.२२५ वर्षांनंतर दुर्मीळ योगअधिक आषाढ मासानंतर म्हणजे १८ वर्षांनंतर येणारे कोकिळा व्रत यंदा ३० जुलै ते २९ आॅगस्टदरम्यान साजरे होत आहे. यापूर्वी हे व्रत १९९६ मध्ये साजरे झाले. सिंहस्थ पर्वणीत हे व्रत यापूर्वी शके १७१२ म्हणजे इ.स. १७९० मध्ये आले होते. म्हणजे, तब्बल २२५ वर्षांनंतर हा दुर्मीळ दुग्धशर्करायोग येत आहे. असे करतात व्रत...प्रथम दिवशी संकल्प व विधिवत पूजा करून महिनाभरात उपोषण, नक्त भोजन, भूशय्या, कोकिळा शब्दश्रवण व धार्मिक ग्रंथवाचन, अन्नदान, परोपकार कृत्ये असे नियोजन असते. आपल्या शक्ती व इच्छेनुसार किमान सात किंवा तीन दिवस तरी हे व्रत करावे, असे धार्मिक शास्त्र सांगते. - सुहास शूर, जामदा, ता. चाळीसगाव