लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका येथील जिलानी बिल्डिंग कोसळून सोमवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. तर आणखी १५ ते २0 जण ढिगाºयाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सोमवारी रात्रीपर्यंत १४ मृतदेह हाती लागले होते. तर बुधवारी पहाटेपर्यंत आणखी 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेच्या 48 तासांनंतरही बचावकार्य सुरूच होते. दुर्घटनास्थळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी भेट दिली. चौकशी करून दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू. शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वाढीव चटईक्षेत्र मंजूर करणे, पुनर्वसनाची व्यवस्था करणे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.सहायक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंता निलंबितभिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी प्रभाग समिती ३ चे सहायक आयुक्त सुदाम जाधव आणि कनिष्ठ अभियंता दूधनाथ यादव यांना निलंबित केले आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांना सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.