ठाणे : होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे आयोजित पक्षी मित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. रविवारी संमेलनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस पार पडला. अभ्यासपुर्ण सादरीकरण, व्याख्यानाने हे सत्र रंगले होते. सुरूवातीला बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे यांनी अमुर फाल्कन या ससाणाच्या जातीच्या संवर्धनाविषयी सादरीकरण केले. सुरूवातीला नागालँड येथे अमुर फाल्कनची केली जाणारी शिकार आणि त्यानंतर स्थानिकांमध्ये करण्यात आलेल्या जागृतीमुळे त्या ठिकाणी थांबलेली शिकार ही सर्व माहिती त्यांनी उदाहरणासह सादरीकरणात दिली. त्यानंतर काही पक्षीमित्रांनी यासंदर्भात त्यांना काही प्रश्न विचारुन आपल्या शंकांचे निरसन केले. विंडो बर्डिंग या विषयावर ठाण्यातील सीमा राजशिर्के यांनी सादरीकरण केले. आपल्या घरातील खिडकीतून त्यांनी टिपलेल्या पक्ष्यांचे छायाचित्र, त्यांची माहिती, त्यांचा स्वभाव, त्यांची नावे त्यांनी सादरीकरणातून दाखविली. डोंबिवलीत सुरू झालेल्या बर्ड रेस या विषयावर प्रथमेश देसाई याने सादरीकरण केले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील पक्षीमित्रांचा मिळणारा सहभाग याविषयी त्याने सांगितले. रविंद्र साठे यांनी ठाणे पक्षी गणनावर सादरीकरण केले. ठाण्यात पक्षी गणनेला झालेली सुरूवात, कोणत्या ठिकाणी केली जाते, किती गटांत केली जाते याची माहिती सादरीकरणातून पक्षीमित्रांना पाहायला मिळाली. त्यानंतर नेचर कन्झर्वेशन सोसायटी आॅफ नाशिकच्या प्रतिनीधी प्रतिक्षा कोथुळे हिने सादरीकरण केले. डॉ. सुधाकर कुºहाडे यांनी अहमदनगरमधील पक्षी आणि त्यांचे संवर्धन याविषयी माहिती दिली. यात त्यांनी अहमदनगर येथे सुरू झालेल्या ‘चला पक्षी पाहु या’ या स्तुत्य उपक्रमाची माहिती सांगितली.
ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे रविवारी गुंफले दुसरे पुष्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 4:30 PM
ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफले. बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे यांच्या सादरीकरणाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात झाली.
ठळक मुद्देरविवारी संमेलनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस पार पडला.अभ्यासपुर्ण सादरीकरण, व्याख्यानाने रंगले सत्र डॉ. दीपक आपटे यांचे अमुर फाल्कनच्या संवर्धनाविषयी सादरीकरण