शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

पालिकेला सर्वेक्षणात आढळली ३२५ पडीक वाहनं ; परिवहन विभागा कडे नोंदणी रद्द करण्यासाठी पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 9:54 PM

मीरा भाईंदर महापालिकेने  रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यासह नोटीसा बजावण्यास सुरवात केल्या नंतर आज सोमवार पर्यंत ३२५ वाहनं आढळून आली

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने  रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यासह नोटीसा बजावण्यास सुरवात केल्या नंतर आज सोमवार पर्यंत ३२५ वाहनं आढळून आली आहेत . या वाहनांवर ४८ तासात वाहन उचलण्याच्या  नोटिसा लावण्यात आल्या आहे . सर्वेक्षण अजून सुरु असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे .  मालकाने वाहन सोडवून नेले नाही तर त्याची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागा कडे यादी पाठवली जाणार आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिलेल्या आदेशा नंतर शहरातील पडीक - बेवारस वाहनां विरूद्ध कारवाई गेल्या आठवड्या पासून सुरु झाली आहे . रस्ते , पदपथ , उद्याने , मैदाने व अन्य सार्वजनिक ठिकाणी पडून असलेल्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले आहे . या मुळे आपली नादुरुस्त वा भंगार वाहने ठेवण्यासाठी पालिका रस्ता आदी सार्वजनिक जागांचा वापर करणाऱ्यां मध्ये धावपळ सुरु झाली आहे . 

सर्वेक्षण करण्यासाठी  कनिष्ठ अभियंता , स्वच्छता निरीक्षक यांच्या सोबतच कर विभागाच्या निरीक्षकांना देखील सहभागी केले आहे. सर्वेक्षणात पडीक वाहन दिसताच जागीच प्रभाग अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची नोटीस देखील चिटकवली जात आहे . दुचाकी, रिक्षा , टेम्पो , कार , ट्रक आदी प्रकारच्या वाहनांचा यात समावेश आहे. दोन दिवसाचा अवधी नोटिशीत वाहन काढून घेण्यासाठी दिला आहे . वाहन न उचलल्यास महापालिका ते उचलून नेईल . ते सोडवण्यासाठी आवश्यक दंड व शुल्क नाही भरले तर 8 दिवसांनी प्रादेशिक परीवहन विभागास पत्र देऊन वाहनाचे नोंदणी रद्द करण्याची विनंती केली जाईल . नोंदणी रद्द झाल्यावर वाहन भंगारात लिलावात काढले जाईल असे अतिक्रमण विभाग प्रमुख संजय दोंदे म्हणाले .  प्रभाग समिती ६ च्या हद्दीत सर्वात जास्त १५० पडीक वाहनं आढळली आहेत . तर प्रभाग समिती १ मध्ये ५०; प्रभाग समिती २ मध्ये १३; प्रभाग समिती ३ मध्ये ४८ ; प्रभाग समिती ४ मध्ये ४० तर प्रभाग समिती ५ मध्ये २४ पडीक वाहनं सोमवार पर्यंत केलेल्या सर्वेक्षणात आढळली असल्याचे दोंदे म्हणाले .