शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ठाण्यात 33 हजार 492 किलो निकृष्ट खाद्यतेल जप्त; कंपनीवर एफडीएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 1:43 AM

उत्पादन थांबविण्याचे दिले आदेश

n  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या ठाणे तालुक्यातील पिंपरी येथील कंपनीवर ठाणे अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये २६ लाख ८५ हजारांचे विविध प्रकारचे ३३ हजार ४९२ किलो ग्रॅम खाद्यतेल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) यशवंत दौंडे तसेच राहुल तकटे, गौेतम जगताप आणि व्यंकट चौहाण या अधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एनएम एंटरप्रायझेस या पिंपरी येथील कंपनीवर धाड टाकून कारवाई केली. या कंपनीत भेसळयुक्त तसेच निकृष्ट दर्जाच्या तेलाची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या पथकाने ही कारवाई केली. या कंपनीमध्ये सकस, चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित खाद्यतेलाची निर्मिती होते का, याच्या तपासणीसाठी कंपनीची सुसज्ज प्रयोगशाळा नव्हती. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेवर निरीक्षणासाठी तज्ज्ञ व्यक्ती नव्हती. 

खाद्यतेल ज्या मानांकनामध्ये निर्मिती होणे अपेक्षित आहे, तसा त्याचा दर्जा नव्हता, ते पॅकिंग करण्यासाठीही योग्य खबरदारी घेतलेली नव्हती.  अशा अनेक त्रुटींमुळे गाळा क्रमांक ९५२ मधील या तेल उत्पादनाच्या कारखान्यातील २१ लाख ४१ हजार ५९२ रुपयांचे २९ हजार ९९६ किलो ग्रॅम रिफाइन सोयाबीन तेल, एक लाख ४३ हजार ८०८ रुपयांचे एक हजार ४९८ किलो ग्रॅम वजनाचे पामोलिन तेल आणि तीन लाख ९९ हजार ६०० रुपयांचे एक हजार ९९८ किलो ग्रॅम वजनाचे खोबरेल तेल याठिकाणी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे