शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

ठाणे-मुंबईत ३३५ किमीचे मेट्रोचे जाळे, दीड लाख कोटीचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:42 AM

नूतन वर्ष ठाणे-मुंबईसाठी मेट्रोचे वर्ष ठरणार आहे. या दोन्ही महानगरांमध्ये सुमारे ३३५ किलोमीटर अंतर कापणाऱ्या मेट्रोवर वर्षभरात सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प मुंबई मेट्रोपोलिटन रिजनने (एमएमआर) केला आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : नूतन वर्ष ठाणे-मुंबईसाठी मेट्रोचे वर्ष ठरणार आहे. या दोन्ही महानगरांमध्ये सुमारे ३३५ किलोमीटर अंतर कापणाऱ्या मेट्रोवर वर्षभरात सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प मुंबई मेट्रोपोलिटन रिजनने (एमएमआर) केला आहे. मेट्रोच्या मुख्य १२ मार्गांसह सुमारे ६९.७ किमीच्या मुख्य कॉरिडॉरच्या कामांचा यात समावेश आहे. यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या कामांच्या सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक राज्य शासनाच्या संबंधित प्रशासनाकडे तयार आहे.नूतन वर्ष २०१९ मेट्रोसाठी ऐतिहासिक वर्ष ठरणार आहे. मुंबई-ठाणे या महानगरांमध्ये एक लाख ४९ हजार ३४३ कोटी खर्चून मेट्रो ३४६.४ किमी सुसाट धावणार असल्याचा संकल्प एमएमआरने या नूतन वर्षात केल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील ११.४ किलोमीटरच्या मार्ग क्र.१ वर वरसोवा ते घाटकोपर मेट्रो धावत आहे. त्यावर आधीच दोन हजार ३५६ कोटी रुपये खर्च झाला आहे. उर्वरित मेट्रोचे मुख्य ११ मार्ग आणि दोन उपमार्ग मिळून सुमारे २६५.३ किलोमीटरचा मार्ग या नूतन वर्षात मार्गी लागणार आहे. यावर सुमारे एक लाख २२ हजार ८४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधील मेट्रोच्या या ११ मुख्य मार्गांसह दोन उपमार्गांपैकी पाच मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात दोन उपमार्गांचाही समावेश आहे. या सर्व मार्गांवर ६१ हजार २८९ कोटी खर्च होत आहे. यातून दहिसर ते नागर या १८ किलोमीटरच्या मार्गाचे काम सहा हजार ४१० कोटी खर्चून सुरू आहे. याप्रमाणेच नागर ते मांडला २३ किलोमीटर, अंधेरी (पू.) ते दहिसर (पू.) १६.५ किमी, कुलाबा ते सीप्झ ३३.५ किमी आणि वडाळा ते कासारवडवली हा ३२.३ किमी मार्ग अशा पाच मार्गांवरील मेट्रोसाठी ६१ हजार २८९ कोटी खर्चाची कामे सुरू आहेत.नूतन वर्षात लवकरच ५२.९ किमी मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी २१ हजार ६०७ कोटी रुपये खर्चास शासनाची मंजुरीही मिळाली आहे. यामध्ये ठाणे-भिवंडी-कल्याणदरम्यानच्या २४ किमीवर आठ हजार ४१७ कोटी, तर लोखंडवाला ते विक्रोळी या १४.५ किमीच्या मार्गावर सहा हजार ६७२ कोटी खर्च होणार आहे. याप्रमाणेच दहिसर, मीरा रोड, भार्इंदर आणि अंधेरी (पू.) ते छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट या १३.५ किमीच्या मार्गावर सहा हजार ५१८ कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे. या सर्व ५२.९ किमीच्या तीन मेट्रो मार्गांवर २१ हजार ६०७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक तयार झाले आहे.याप्रमाणेच खर्चाच्या मंजुरीसाठी पाच मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. सुमारे ८७.९ किमी अंतराच्या या मेट्रोसाठी सुमारे ३९ हजार ९४९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या रकमेतून कासारवडवली ते गायमुख या २.७ किमीच्या मार्गासाठी ९४९ कोटी खर्च अपेक्षित आहे. एअरपोर्ट मेट्रो-नवी मुंबई यादरम्यान ३५ किमीच्या मेट्रोवर १५ हजार कोटी रुपये खर्च निश्चित केला आहे. याशिवाय, गायमुख ते शिवाजी चौक या ११.२ किमीच्या मार्गासाठी पाच हजार कोटींचा खर्च आहे. वडाळा ते जीपीओ या १४ किमीच्या मार्गासाठी आठ हजार कोटी आणि कल्याण ते तळोजा या २५ किमी मेट्रोसाठी ११ हजार कोटी रुपये खर्चाचे काम या नूतन वर्षात हाती घेतले आहे.सहा महिन्यांतच कामाचे नियोजननूतन वर्षाच्या सहा महिन्यांतच मेट्रोच्या मुख्य कॉरिडॉरच्या कामांचे नियोजन आहे. यामध्ये ६९.७ किमीच्या मार्गांचा समावेश आहे. त्यासाठी २४ हजार १४२ कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे. या खर्चात मंबई मोनोरेलच्या फेज-२ च्या कॉरिडॉरचा समावेश आहे. यात वडाळा ते जाकोब सर्कल या १९.५ किमीच्या मार्गाच्या कामाचा समावेश आहे.दोन हजार ६४० कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे. याशिवाय, मे २०१९ दरम्यान २२ किमीच्या मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक या कामावर १४ हजार कोटी खर्च होणार आहे. याप्रमाणेच वरसोवा ते बांद्रा सी लिंक दरम्यानही नुकतेच तांत्रिक सर्वेक्षण हाती घेतले आहे. नुकतेच तांत्रिक सर्वेक्षण हाती घेतले आहे.सी लिंक आणि एमएसआरडीसीद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरूअसून ते विरारपर्यंत होणार आहे. या १७.७ किमीच्या कामावर सात हजार ५०२ कोटींच्या खर्चाचा अंदाज आहे. भार्इंदर ते विरार या १०.५ किमीच्या मेट्रो कॉरिडॉरचे कामदेखील या नूतन वर्षातच होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो