शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

सेनेच्या इच्छुकांत ३५ पदवीधर

By admin | Published: April 29, 2017 1:33 AM

भिवंडीमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पक्ष कार्यालयात बैठकांवर बैठका होत

रोहिदास पाटील / अनगावभिवंडीमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पक्ष कार्यालयात बैठकांवर बैठका होत असून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेकडून मागील चार दिवसांत १०८ जणांनी अर्ज नेले असून ७० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सेनेतील इच्छुकांच्या यादीत ३५ जण पदवीधर आहेत. सुशिक्षित उमेदवाराला तिकीट देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या निवडणुकीत विद्यमान सर्वच नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर, आठ पतीपत्नी निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती शिवसेनेचे शहर जिल्हासचिव दिलीप नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. महापौर तुषार चौधरी, त्यांच्या मातोश्री व नगरसेविका उषा यशवंत चौधरी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक मदन नाईक, गुलाब नाईक, सुंदर नाईक, अनिता नाईक, माजी उपमहापौर मनोज काटेकर, वंदना काटेकर, शहर जिल्हा सचिव दिलीप नाईक, रंजना नाईक, श्रीनाथ पाटील, आनंदी पाटील हे पतीपत्नी पुन्हा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला भाजपा, काँग्रेस, समाजवादी, अपक्ष आदी १८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यात गुजराती, मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती उपशहरप्रमुख मनोज गगे यांनी दिली. इच्छुकांपैकी ३५ जण पदवीधर, तर अन्य बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची आ. रूपेश म्हात्रे, शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने, प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार आहे. उमेदवारांच्या मुलाखती १ व २ मे रोजी होणार असून ३ किंवा ४ मे रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. ५, ६ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, असे शहर सचिव दिलीप नाईक यांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार मंगळवारी ठरणार-पंकज रोडेकर/ ठाणे भिवंडी महापालिकेसाठी काँग्रेस पक्षाने इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जवळपास पूर्ण झाला आहे. त्यातच, इतर महापालिकांच्या निवडणुकीप्रमाणे भिवंडीतही पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असल्याने त्यादृष्टीने काँग्रेसकडून उमेदवार चाचपणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी याबाबत काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीत यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इच्छुकांना अर्जवाटप करून मुलाखती घेऊन तयारी सुरू केली होती. त्यानंतर, त्या इच्छुकांची चाचपणीही केली. त्यातच बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर ही निवडणूक लांबणीवर पडते की काय, अशी शंका होती. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखेलाच निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, तत्पूर्वीच इतर राजकीय पक्षांच्या एक पाऊल पुढे असलेल्या काँग्रेसकडून पॅनलपद्धतीनुसार इच्छुकांची चाचपणी अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी मुंबईत बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच भिवंडीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजपाविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट