ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी ३५१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २५ हजार ४८८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार २९९ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ७० रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख ३१ हजार ७६४ झाली आहे. शहरात चार मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या एक हजार ९४६ झाली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत ८८ रुग्णांची वाढ झाली असून, दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६५ रुग्णांची वाढ झाली असून, सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये सात रुग्ण सापडले असून, एका मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत सात बाधित असून, एका मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये ५६ रुग्ण आढळले असून, दोन जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून, एका मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये ११ रुग्णांची नोंद असून, पाच जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ३७ नवे रुग्ण वाढले आहेत तर, एका मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या ३८ हजार ३६९ झाली असून, आतापर्यंत ११२८ मृत्यूची नोंद आहे.