वाडा : या तालुक्यातील गारगाई पुलासाठी ३ कोटी ६५ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली असून त्याचे टेंडर काढण्यात आले आहे. येत्या ४ ते ६ दिवसात ते निश्चित होईल व त्यानंतर या महिना अखेरीस काम सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत संख्ये यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या तालुक्यातील गारगाई नदीवरील पूल २३ फेब्रुवारी २०१४ ला अवजड वाहन गेल्याने कोसळला. यामुळे या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला असून त्याला दोन वर्षे झाले तरी नव्या पुलाचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांना व विद्यार्थाना खडतर प्रवास करून तालुक्याचा ठिकाणी ये जा करावी लागते आहे. नदीपलिकडील नाकाडपाडा , झुगरेपाडा या गावातील नागरिकांना तर जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागत असल्याने पुलाचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली होती.
गारगाई पुलासाठी ३.६५ कोटी
By admin | Published: December 21, 2015 1:14 AM