सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कोपरी येथील तालुका क्रीडा संकुल येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘योग दिन खूप महत्वाचा आहे. आजच्या काळात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. साथीच्या रोगांना दूर करण्यासाठी शरीर व मन स्वस्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात योगाभ्यास करावा. योगा एकच दिवस न करता ३६५ दिवस करणे गरजेचे आहे. यामुळे आपले जीवनमान व्यवस्थित राहिल, असे सुताेवाच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना केले.
जिल्हा प्रशासन, ठाणे जिल्हा परिषद व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी धुगे बाेलत हाते. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, लेखाधिकारी २ रविंद्र सपकाळे, उप अभियंता भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा ठाणे संजय सुकटे, पंतजली योग संस्थेच्या जिल्हा प्रभारी रंजना तिवारी, ठाणे जिल्हा योग संघटना सचिव राजेश पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
भारत स्काऊट गाईड, नेहरू युवा केंद्र, पतंजली योग समिती या संस्थांचे प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, बेडेकर विद्यामंदिरचे स्काऊड गाईडचे विद्यार्थी व शिक्षक,मंगळा विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पतंजली योग केंद्राच्या योग समितीच्या जिल्हा प्रभारी रंजना तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांकडून योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले.