शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

क्रिप्टो करन्सीच्या खरेदी-विक्रीतून जादा परताव्याच्या प्रलोभनाने ३७ लाखांचा गंडा

By जितेंद्र कालेकर | Published: July 14, 2023 9:07 PM

सेलिब्रिटीचे खाते लाइक करण्याचेही आमिष : शोधासाठी पोलिसांची दाने पथके

ठाणे: इन्स्टाग्रामवरील सेलिब्रेटींच्या खात्यांना लाइक करण्याबरोबरच क्रिप्टो करन्सीच्या प्रीपेड टास्क प्लॅनमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास क्रिप्टो करन्सीच्या खरेदी-विक्रीतून जास्त परतावा मिळेल, या प्रलोभनापोटी चौघांनी तरुणाला ३७ लाखांचा गंडा घातल्याची घटना अलीकडेच उघड झाली. यातील आरोपींच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केल्याची माहिती शीळ डायघर पोलिसांनी शुक्रवारी दिली.

नोकरीच्या शोधात असलेल्या डायघर भागातील ३२ वर्षांच्या तरुणाला नोकरीबाबत काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता. त्याने चौकशी केल्यानंतर मीरा नामक महिलेने त्याला इन्स्टाग्रामवर सेलिब्रेटींच्या खात्यांना लाइक करण्यास सांगितले. यात प्रत्येक लाइक मागे ७० रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात आले. ही नोकरी केल्यास दररोज दोन हजार ते तीन हजार रुपये मिळतील, अशी बतावणी केली. चांगली रक्कम मिळेल, या आशेपोटी तो नोकरीसाठी तयार झाला.

या कामासाठी त्याला सुरुवातीला २१० रुपये मिळाले. नंतर त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये घेण्यात आले. त्याला सेलिब्रेटींच्या खात्यांना लाइक करण्याच्या कामाबरोबरच क्रिप्टोकरन्सीच्या प्रीपेड टास्कचीही माहिती देण्यात आली. या टास्कमध्ये जितक्या जास्त रकमेची गुंतवणूक करून क्रिप्टो करन्सी विकत घेऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यास मोठा परतावा देण्याचे प्रलोभनही या तरुणाला दाखविण्यात आले. यातूनच त्याने सुरुवातीला नऊ हजार रुपयांची गुंतवणूक केली. तरुणाने टास्क प्रमाणे खरेदी-विक्री केल्यानंतर तरुणाला ९८० रुपयांचा फायदा झाला. नंतर त्याने ३० हजारांचा टास्क निवडला. या टास्कमध्येही त्याला ८ हजार २०० रुपयांचा फायदा मिळाला.

अशाच प्रकारे त्याला पैशाची गुंतवणूक करण्याचे टास्क देत चार तरुणांनी त्याच्याकडून ३७ लाख रुपये ऑनलाइन उकळले. त्यानंतर मात्र त्याला जादा रक्कम किंवा परतावाही देण्यात आला नाही. उलट ३७ लाखांची मुद्दलही फसवणुकीने लाटल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणाने डायघर पोलिस ठाण्यात मीरा, सेरिन, विकास खान आणि अन्य एक अशा चौघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि फसवणुकीच्या कलमाखाली ११ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल केला.दोन पथकांकडून होणार तपास-या फसवणुकीच्या प्रकारात आंतरराज्य टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून यातील आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या दोन पथकांची निर्मिती केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी