विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील २४३ जिल्हा परिषद शाळांपैकी ३७ शाळांमध्ये एकच शिक्षक असून मलवाडा व कुंभीपाडा शाळेत कोणताही शिक्षक नसल्याने तेथे जवळच्या शाळेतील शिक्षक नियुक्त केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मोकाशी यांनी दिली आहे. तालुक्यातील शासकीय धोरण, बेजबाबदारपणा, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष, त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर वचक राहिलेली नाही. खालावत चाललेला दर्जा व विद्यार्थ्यांची होणारी गळती यावर चिंतन करण्यासाठी गरज आहे. काही शाळांची पटसंख्या एवढी कमी झालेली आहे व त्यात १ ली ८ वीपर्यंत वर्ग आहेत. त्यातील ३७ शाळा एकशिक्षकी आहेत. एकंदरीत पोषणाचा बोजवारा उडवला आहे. तरी समायोजनेप्रमाणे प्रत्येक शाळेवर शिक्षक देण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)
विक्रमगड तालुक्यात ३७ शाळा एकशिक्षकी
By admin | Published: November 12, 2015 1:30 AM