ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ३७३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४९ हजार १८२ रुग्णसंख्या झाली आहे. ठाण्यात दोन आणि नवी मुंबईत एक असे एकूण जिल्ह्यात फक्त तीन मृत्यू झाले आहेत. अन्य शहरांत कोठेही मृत्यू झालेला नाही. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ५२ झाली आहे.ठाणे परिसरात १०० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता ५७ हजार २५९ बाधित झाले आहेत. अवघे दोन मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३४० झाली. कल्याण-डोंबिवलीत १०६ रुग्णांची वाढ झाली. या शहरात ५९ हजार ६६ बाधित झाले असून, एक हजार ११८ मृत्यू कायम आहेत.उल्हासनगरला ११ बाधित सापडले असून, एकही मृत्यू नाही. भिवंडीला चार रुग्ण आढळल्याने आता बाधित सहा हजार ६६१ झाले असून, मृतांची संख्या ३५२ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये २८ रुग्णांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये १३ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून, बाधितांची संख्या आठ हजार ४५९ झाली असून, ३०९ मृत्यू कायम आहेत. बदलापूरला २१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे नऊ हजार १३६ बाधित झाले, मृत्यूंची संख्या १२० झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा रुग्णांची नोंद झाली असून, एकही मृत्यू नाही. आता बाधित १८ हजार ९७८ झाले असून, मृत्यू ५८३ नोंदले आहेत.
ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ३७३ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 3:14 AM