शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्ह्यातील 3,837 ग्राहक सहा महिन्यांपासून मीटरविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 1:39 AM

पालघरमध्ये महावितरणकडे वीजमीटरचा तुटवडा; ग्राहक त्रस्त

- हितेन नाईकपालघर/सफाळे : पालघर महावितरण विभागातील सहा तालुक्यांतील सिंगल आणि थ्री फेज विद्युत मीटर्ससाठी सुमारे ३ हजार ८३७ ग्राहकांनी पैसे भरले असताना मागील ५ ते ६ महिन्यांपासून मीटर्स उपलब्ध करून दिले जात नाहीत. खाजगी दुकानदारांकडून मीटर्स लावण्याची परवानगी महावितरण विभागाने दिली असली तरी बाजारातले मीटर्सही गायब झाल्याने अनेक कुटुंबीयांना अंधारात राहावे लागत आहे.पालघर महावितरण विभागांतर्गत पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, अशी सहा तालुके येत असून, पालघर तालुक्यातील पालघर उपविभागांतर्गत १,०६०, बोईसर ग्रामीण ९२७, एमआयडीसी १४६, सफाळे २३२, अशा २ हजार ३६५ ग्राहकांनी मीटर्सची मागणी केली आहे, तर डहाणू ३३६, जव्हार १८८, तलासरी ६३०, मोखाडा ७५, विक्रमगड २४३, अशा एकूण ३ हजार ८३७ ग्राहकांनी नवीन मीटर्ससाठी मागील ६ महिन्यांपासून मागणी अर्ज सादर केले आहेत. मोठ्या कष्टाने घर, दुकान बांधले असताना, फ्लॅट विकत घेतले असताना वीजपुरवठ्यासाठी मीटर मिळत नसल्याने हजारो घरात लाइटच नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची पाळी कुटुंबांवर आली आहे. या ३ हजार ८३७ ग्राहकांनी नवीन मीटरसाठी मागील ६ महिन्यांपूर्वी पैसे भरले आहेत. एक दिवस उशिरा बिल भरल्यावर त्यांना दंड वसूल करणारा महावितरण ६ महिन्यांपासून लाखो रुपये वापरत असून, व्याजरूपाने भरपाई देणार आहे का? असा सवाल ग्राहकांनी केला आहे. ग्राहकांनी मीटरसाठी कार्यालयाचे अनेक हेलपाटे सुरू असून, तुम्ही दुकानदारांकडून मीटर खरेदी करून बिले सादर करा, तुमच्या बिलामधून ते वजा करू, असे महावितरणकडून सांगितले जात आहे.दोन महिन्यांपासून वीज मीटर उपलब्ध नसल्याने ग्राहकांना फेऱ्या मारायची वेळ आली आहे. मीटर ग्राहकांना उपलब्ध करून देणे महावितरण विभागाचे काम आहे.-अमोद जाधव, सरपंच, उंबरपाडा, सफाळेवीज मीटरची मागणी करण्यात आली असून, मीटर उपलब्ध झाल्यास देण्यात येतील. मीटरचा तुटवडा असल्याने ग्राहकांनी बाहेर खरेदी करून मीटर घ्यावे, त्या वीज मीटरचे पैसे बिलामधून कमी करण्यात येतील.-प्रताप मचिये, कार्यकारी अभियंता, पालघर

टॅग्स :electricityवीज