शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

ठाण्याच्या श्रीनाथ मंदिरात ३९ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 9:56 PM

येथील खारकर आळीतील श्रीनाथ मंदिरातून नऊ लाखांच्या रोकडसह ३८ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देरविवारी पहाटेची घटनाचोरटयांनी तोडले दरवाजाचे लॉकनऊ लाखांच्या रोकडचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येथील खारकर आळीतील गुजराथी बांधवांच्या श्रीनाथ मंदिरातून नऊ लाखांच्या रोकडसह ३८ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. सकाळी मंदिरातील पुजाऱ्याची पत्नी साफसफाईसाठी गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.जांभळी नाक्यावर गजबजलेल्या वस्तीमध्ये हे श्रीनाथ मंदिर आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पुजारी परेश पंडीत यांनी मंदिराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चोरटयांनी मंदिराच्या मागच्या बाजूच्या दरवाजाचे लॉक तोडून गाभा-यातील २२ लाख ५० हजारांचे ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने, सात लाखांची २० किलो चांदीची भांडी तसेच नऊ लाखांची रोकड चोरुन नेली. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुजा-याची पत्नी मीना पंडीत तिथे साफसफाईसाठी गेल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली. या प्रकाराने बाजारपेठेतील परिसरात एकच खळबळ उडाली असून ठाणेनगर पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांनीही भेटी देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता शोध पथकाकडून या चोरीचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी