- सदानंद नाईक
उल्हासनगर: कॅम्प नं-२ हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या कांचनसिंग पासी याने शेजाऱ्या सोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून साडे चार वर्षाच्या मुलाची गळा घोटून हत्या केल्याचे उघड झाले. उल्हासनगरपोलिसांनी कांचनसिन पासी याला उत्तरप्रदेशातील प्रयागराज रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली असून न्यायालयाने त्याला ३० एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असती.
उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगर मध्ये राहणार कांचनसिंग पासी या मृत मुलाच्या शेजारी राहत होता. १६ एप्रिल दरम्यान कांचनसिंग यांचे पीडित मुलाच्या आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. या रागातून २० एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान भांडण झालेल्या महिलांचा साडे चार वर्षाच्या मुलाला आईस्क्रीम खाण्याचे आमिष दाखवून शेजारील ऑडनस कंपनीच्या आवारात घेऊन गेला.
मुलाला निर्जनस्थळी नेल्यावर मुलाचा गळा आवळून जिवेठार मारून मुलाचा मृतदेह निर्जनस्थळी टाकून गावी उत्तरप्रदेश येथे पळून गेला. मुलगा घरी आला नाही म्हणून आई वडिलांनी मुलाचा शोध घेऊन उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र त्याच दिवशी अंबरनाथ पोलिसांना एका साडे चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह ऑडनस कंपनीत मिळाला. तेव्हा पीडित महिलांचा मुलगा असल्याचे उघड झाले.
उल्हासनगर पोलिसांनी संशयित आरोपी कांचनसिंग पासी त्याच दिवसा पासून गायब होता. पोलिसांनी त्याचे मोबाईल नेटवर्कवरून त्याला उत्तरप्रदेश प्रयागराज रेल्वे स्टेशन वरून अटक करून पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, ३० एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. किरकोळ भांडणाच्या रागातून साडे चार वर्षाच्या मुलाचा खून झाल्या बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे