ठाणे : मॉं मुद्रा आर्ट अॅकॅडमीच्या वार्षीक स्रेहसंम्मेलनानिमित्त मंथन हा सामूहिक नृत्यविष्काराचा कार्यक्रम काशिनाथ घाणेकर येथे नुकताच झाला. या कार्यक्रमात ४०० बालकलाकारांनी २८ सामूहिक नृत्यविष्कार सादर केले. यावेळी लोकनृत्य, भरतनाट्यम, हिप हॉप , हॉलीवूड, टॉलीवूड मधील गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. लोकमत या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. यातील बांबू नृत्याच्या कार्निव्हलला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. चिमुकल्या पायांनी धरलेल्या त्या ठेक्यांमुळे काशिनाथ घाणेकर सभागृहात उत्साहाचे वातावरण होते. याशिवाय नृत्य परिक्षेमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवदेखील यावेळी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला संचालिका माया सावंत आणि संस्थेच्या सचिव तेजश्री सावंत यांनी योगदान दिले. यावेळी संदुक चित्रपटाचे निर्माते मंदार केणी, माथेरान प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सावंत, नगरसेवक संतोष पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंथनमध्ये ४०० बाल कलाकारांचे नृत्य
By admin | Published: August 30, 2015 11:22 PM