ठाणे - ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल त्या आस्थापनांचा कचरा न उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे. या आस्थापनांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करुन त्याच ठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावावी असे केंद्राने काढलेल्या नव्या आध्यादेशात स्पष्ट केले आहे. त्यानुसार पालिकेने आता ही पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून पालिकेने आतापर्यंत शहरातील सुमारे ४०० सोसायटी, मॉल, हॉटेल, रुग्णालयांना नोटीसा बजावलेले असून त्यांना १५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला सुमारे ७०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पींग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकेचीच ही बोंब नसून देशातील इतर महापालिकांची देखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करण्यात यावे यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला आहे. त्यानुसार केंद्र सरकाराने यासंदर्भात मागील वर्षी एक आध्यादेश काढला आहे. या आध्यादेशात ज्या सोसायटी अथवा आस्थापना यांच्याकडून प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्तीची कचऱ्याची निर्मिती होते. तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करुन त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावावी असे स्पष्ट केले आहे.
- शासनाच्या आध्देशानुसार सर्व्हे आणि त्याच वेळेस नोटीस बजावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे सोसायटी तसेच विविध आस्थापनांनी त्यानुसार उपाय योजना कराव्यात.
(संदीप माळवी - उपायुक्त, ठामपा)
त्यानुसार आता ठाणे महापालिकेने मागील १५ दिवसापासून शहरातील अशा आस्थापनांचा सर्व्हे करण्यास सुरवात केली आहे. वागळे, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीचा सर्व्हेचे काम सुरु असून उर्वरीत सहा प्रभाग समितींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता या प्रभाग समितीमधील तब्बल ४०० हून अधिक सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाने दिल्या आहेत. विविध प्रभाग समितीमधील थेट हिरानंदानी, रुस्तमजी, वृदावंन, श्रीरंग, आकाशगंगा, लोढा, दोस्ती, दौलत नगर, प्रेमनगर, नातु परांजपे, हावरे सिटी, श्रीजी व्हिला, राजदीप सोसायटी, सरोवर दर्शन, सह्याद्री, रघुकुल, वास्तु आनंद, ओझन व्हॅली, संघवी हिल्स, अमृतांगण, रुतु पार्क रुनवाल गार्डन, आदींसह शहरातील इतर महत्वाच्या सोसायट्यांना आतापर्यंत नोटीसा बजावण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे. यांच्यासह टिपटॉप, प्रशांत कॉर्नर, उत्सव हॉटेल या मोठ्या हॉटेल्ससह इतर महत्वांच्या हॉटेलवाल्यांना बॅन्केट हॉल, मोठ मोठी रुग्णालये, आयटी पार्कसह वाणिज्य आस्थापनांना देखील नोटीसा बजावण्यात आल्याचे सांगितले.*मालमत्ता करात पाच टक्के सवलतया सर्वांना येत्या १५ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून जे ओला आणि सुका कचरा वेगळा करुन, त्यावर निर्मितीच्याच ठिकाणावर शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्याचे सुचीत करण्यात आले आहे. जे अशा पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावतील त्यांना मालमत्ता करात ०५ टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.*२०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पालिकेची जबाबदारी होणार हलकीशहरात ७०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत असून आता यामुळे निर्मितीच्या ठिकाणी यातील ३० टक्के म्हणजेच २०० मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचा पालिकेचा भार हलका होणार आहे.सर्वाधिक १३४ आस्थापना माजिवडा - मानपाड्यात*माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक १३४ आस्थापना असून यामध्ये सोसायटींची संख्या सर्वाधिक आहे. तसेच येथे २८ हॉटेल, २ आयटी पार्क, २४ हॉस्पीटल आदींचा देखील समावेश आहे. तसेच उथळसर -२१, नौपाडा आणि कोपरी - ४७, कळवा - २३, लोकमान्य - सावरकरनगर - ५५, वर्तकनगर ६१ आदी आस्थापनांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. तर वागळे, मुंब्रा आणि दिव्यात सध्या सर्व्हे सुरु आहे. सर्व्हे सुरु असतांनाच नोटीसा बजावण्याचे काम सुरु आहे.*घंटागाडीद्वारे केली जाणार जनजागृतीयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी घनकचरा विभागामार्फत घंटागाडीचा आधार घेतला जाणार आहे. येत्या काही दिवसात या घंटागाड्यांद्वारे उदघोषणा केल्या जाणार असून याबाबतची माहिती दिली जाणार आहे.*१५ डिसेंबर नंतर लागणार दंडयेत्या १५ डिसेंबर पर्यंत या आस्थापनांनी याबाबत ठोस पावले उचलली नाहीत, किंवा त्यांना आपला कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला तर त्यांच्यावर २०० रुपयापासून ते थेट २० हजारापर्यंतचा दंड आकारला जाणार आहे.