ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ४०९ नव्या कोरोना रु ग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २५ हजार १३७ रु ग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २६ रु ग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या दहा हजार २७६ इतकी झाली आहे.ठाणे शहर परिसरात ८६ रु ग्ण आढळल्याने येथील रु ग्ण संख्या आता एक लाख ३१ हजार ६९४ झाली आहे. शहरात दोघांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या एक हजार ९४२ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत ११० रु ग्णांची वाढ झाली असून दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६२ रु ग्णांची वाढ झाली असून तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये नऊ रु ग्ण आढळले असून एकाच्या मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत सहा बाधीत झाले. मीरा भार्इंदरमध्ये ४३ रु ग्ण आढळले असून तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. अंबरनाथमध्ये १७ रु ग्ण आढळले असून १५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ६२ नवे रु ग्ण वाढले आहेत. आता बाधीत रु ग्णसंख्या ३८ हजार ३३२ झाली असून आतापर्यंत एक हजार मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात ४०९ नविन कोरोना रुग्णांची नोंद: २६ जणांचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 11:59 PM
ठाणे जिल्ह्यात रविवारी ४०९ नव्या कोरोना रु ग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २५ हजार १३७ रु ग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २६ रु ग्णांचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देजिल्ह्यातील मृतांची संख्या दहा हजार २७६आता पाच लाख २५ हजार १३७ रुग्णांची नोंद