शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

पालिकेच्या उत्पन्नात ४२६ कोटींची वाढ

By admin | Published: February 07, 2016 2:31 AM

मागील वर्षीच्या तुलनेत ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात यंदा तब्बल ४२६ कोटींची वाढ झाली आहे. आयुक्तांनी प्रत्येक विभागाला दिलेले लक्ष्य आणि त्यानुसार तितक्याच तत्परतेने अधिकारी

ठाणे : मागील वर्षीच्या तुलनेत ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात यंदा तब्बल ४२६ कोटींची वाढ झाली आहे. आयुक्तांनी प्रत्येक विभागाला दिलेले लक्ष्य आणि त्यानुसार तितक्याच तत्परतेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका, यामुळे पालिकेची आर्थिक नाडी रुळांवर येऊ लागली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी दोन महिने शिल्लक असल्याने या काळात आणखी २०० कोटींची वाढ करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेची आर्थिक बाजू कोलमडली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेत ठेकेदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. निधी मिळत नसल्याने नगरसेवकही तोंडसुख घेत होते. परंतु, याच कालावधीत पालिकेची सूत्रे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हाती घेतली. हळूहळू का होईना, त्यांनी उत्पन्नाच्या इतर स्रोतांकडे लक्ष केंद्रित करून प्रत्येक विभागाला टार्गेट देऊन पूर्ण न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार, या वर्षी जानेवारीअखेर पालिकेचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत ४२६ कोटींनी वाढले आहे. विशेष म्हणजे पालिकेने मागील महिन्यापासून वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये मुंब्य्रातून एकाच दिवसात १ कोटीहून अधिक वसुली झाली. या मोहिमेला काँग्रेसने विरोध केला असला तरी ती सुरूच राहणार असल्याचा निर्धार पालिकेने केला. त्याचा परिणाम म्हणून आता १० महिन्यांतच विक्रमी वसुली केली गेली.१ एप्रिल ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान पालिकेच्या तिजोरीत १०२० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. परंतु, यंदा याच कालावधीत ते १४४६ कोटींवर नेले आहे. विशेष म्हणजे एलबीटी बंद झाल्यानंतरही या विभागाकडून आतापर्यंत ४४९ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)एक वर्षात असे वाढले उत्पन्नविभागाचे नाव१ एप्रिल ते १ एप्रिल ते झालेली वाढ३१ जाने. २०१५३१ जाने. २०१६मालमत्ता कर२०४.६२ कोटी२३२.४७२७.८५ कोटीस्थानिक संस्था कर३३०.५८४४९.९८११९.४०स्टॅम्प ड्युटी व इतर११२.४८९१.९३-२०.५५ कोटीशहर विकास विभाग१९७.०४३५६.१०१५९.०६पाणीपुरवठा विभाग५२.७९६१.८७९.०८जाहिरात विभाग५.२२७.५०२.२८सार्वजनिक बांधकाम५२.७८१२०.३०६८.१९अग्निशमन दल४२.३५३६.६६-५.६९स्थावर मालमत्ता२.०५४.०२२.०२घनकचरा२०.२०२४.६२५.४२एकूण१०२०.१९ कोटी१४४६.५१ कोटी४२६.३२ कोटी