शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

४३ लाखांची फसवणूक, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 3:36 AM

पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने नौपाड्यातील ४३ वर्षाच्या महिलेची ४३ लाख ७४ हजार ३९५ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात १ मार्चला गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने नौपाड्यातील ४३ वर्षाच्या महिलेची ४३ लाख ७४ हजार ३९५ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात १ मार्चला गुन्हा दाखल झाला आहे.मंत्रालयात गृह विभागात मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाºयाच्या मोबाईलवर आॅगस्ट २०१४ मध्ये मयांक अवरवी याने फोन केला होता. मी आयसीआयसीआय बँकेतून बोलत असून ‘तुमच्या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्याने तिचे पैसे पाहिजे असल्यास १३ हजार ५०० रुपये तुम्हाला भरावे लागतील,’ असे त्याने सांगितले. हा फोन आल्यानंतर या महिला अधिकाºयाने कोणतीही खात्री न करता पैसे भरले. त्यानंतरही त्यांना वारंवार असेच फोन आल्यामुळे त्यांनी शेवटचे फेब्रुवारी २०१८ मध्ये १० लाख रुपये भरले. मधल्या काळात डीएफआय सर्व्हिसेसचे कृष्णकुमार, अमितसिंग ठाकूर, सुशीलकुमार, कमलेशकुमार श्रीवास्तव अशा पाच जणांनी पॉलिसीचे पैसे देण्याच्या नावाखाली त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या ई मेल आयडीवर आरबीआय, सेबी आणि आयकर विभाग तसेच नॅशनल प्रोडक्टविटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या नावाने पैसे भरण्याबाबतची खोटी पत्रे पाठविली. त्यांनी पैसे भरल्यानंतर खोट्या पावत्याही पाठविल्या. ८ आॅगस्ट २०१४ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत वारंवार पैसे भरण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून ४३ लाख ७४ हजार ३९५ इतकी रक्कम काढून त्यांची फसवणूक केली. ही सर्व रक्कम त्यांच्या खात्यातून एनईएफटीद्वारे वळती करण्यात आली. या महिलेला फोन करतांना मयांक अवरवी तसेच कृष्णकुमार अशी नावे सांगणाºया भामट्यांनी एसबीपी सोल्यूशन, सीएफटी सोल्यूशन्स, संगम एन्टरप्रायजेस, आरबी सोल्यूशन्स, आयटी इंडिया, आॅलथिंग सोल्यूशन्स, एफआय सर्व्हिसेस, कस्टमर व्हॅल्यू सर्व्हिसेस, एसटीएफ केअर अशा वेगवेगळया कंपन्यांमधून बोलत असल्याची बतावणी करुन त्यांना विश्वासात घेतले. प्रत्यक्षात त्यांना पॉलिसीचे पैसे किंवा त्यांच्याकडून घेतलेल्या ४३ लाख ७४ हजारांपैकी कोणतीही रक्कम दिली नाही. या महिलेची मुलगी चेन्नई येथून आली तेंव्हा तिने या सर्व प्रकाराची खातरजमा केल्यानंतर ई मेलवरुन आलेली पत्रे आणि पावत्या खोट्या असल्याचे तिला आढळले. त्यानंतर त्यांनी अखेर या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात १ मार्च २०१८ रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

इतर ग्राहकांसाठी पोलिसांचे मार्गदर्शनकोणत्याही बँकेतून किंवा विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगितल्यानंतर किंवा अमूक इतकी रक्कम भरा मग पॉलिसीचे पैसे मिळतील, असा फोन आल्यानंतर संबंधितांनी प्रथम विमा कंपनी किंवा बॅकेंकडे त्याबाबतची खात्री करणे आवश्यक आहे. केवळ एखाद्या फोनवर विश्वास ठेवू नये. त्याची पडताळणी करावी. केवळ फोनवरुन किंवा ईमेलवरुन आलेल्या पत्रामुळे लगेचच एनईएफटीद्वारे किंवा धनादेशाने कोणताही व्यवहार करु नये.-विशाल बनकर, सहायक पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे.